Tuesday, July 2, 2024

Latest Posts

युरोपमधील देशांनी विद्यापीठांमध्ये भारतविषयक अभ्यासक्रम राबवावे, राज्यपाल Ramesh Bais यांचे निर्देश

आज युरोपियन युनियन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. त्याचप्रमाणे भारत देखील युरोपियन युनियनसाठी नववा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.

राज्यपाल  बैस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विविध देशांच्या वाणिज्यदूतांच्या उपस्थितीत मुंबई येथे ‘युरोप दिवस’ साजरा करण्यात आला. भारत व युरोपीय देशांचे संबंध अनेक शतकांपासून चालत आले आहेत. भारतीय राज्यघटनेत अनेक युरोपीय देशांच्या राज्यघटनांची वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.  भारताची अर्थव्यवस्था सातत्याने वाढत असून युरोपीय  राष्ट्रांनी उद्योगव्यापाराशिवाय आता भारतातील आणि विशेषतः राज्यातील विद्यापीठांशी सहकार्य वाढवावे, आपल्या विद्यापीठांमध्ये भारतविषयक अभ्यासक्रम राबवावेत असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. द काउंसिल ऑफ युरोपियन युनियन (ईयू) चेंबर्स ऑफ कॉमर्स इन इंडियातर्फे या भारत – युरोप व्यापार वृद्धीसाठी कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे युरोप दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यपाल बैस म्हणाले, भारत आज जगातील सर्वात तरुण राष्ट्र म्हणूनही उदयास आले आहे. वाढती वृद्ध लोकसंख्या असलेले जगातील प्रगत देश त्यांच्या कुशल मनुष्यबळाच्या गरजेसाठी भारताकडे पाहत आहेत. भारतात कार्यरत असलेल्या युरोपीय कंपन्यांनी युवकांच्या कौशल्यवर्धनाच्या प्रयत्नांना हातभार लावल्यास त्याचा फायदा भारताइतकाच युरोपियन देशांनाही होणार आहे. विद्यापीठांशी सहकार्य वाढवताना युरोपमधील देशांनी आपापल्या विद्यापीठांमध्ये इंडॉलॉजी‘ सारखे अभ्यासक्रम राबवावे तसेच संस्कृत भाषेसह हिंदी व इतर भारतीय भाषांच्या अध्ययन – अध्यापनाला चालना द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करुन राज्यपाल बैस म्हणाले,   भारतीय स्वातंत्र्य चळवळ फ्रेंच राज्यक्रांतीच्या स्वातंत्र्यसमानता आणि बंधुता’ या ब्रीद वाक्याने प्रेरित होती. देशाच्या राज्यघटनेने ब्रिटिशआयरिशफ्रेंचजर्मन आणि इतर राज्यघटनांमधूनही काही वैशिष्ट्ये घेतली आहेत. त्यामुळे राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांनी तसेच सामायिक मूल्यांनी भारत युरोपियन राष्ट्रांशी जोडले आहे. भिन्न राष्ट्रे, परस्पर सीमा व मतभेदांवर मात करून समान ध्येयांसाठी कसे एकत्र काम करू शकतात याचे युरोपियन संघ उत्तम उदाहरण असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

आज युरोपियन युनियन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. त्याचप्रमाणे भारत देखील युरोपियन युनियनसाठी नववा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारताने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य ठेवले असून देशाची अर्थव्यवस्था चांगल्या गतीने वाढत आहे. त्यामुळे आपले आर्थिक संबंध अधिक दृढ आणि सुधारण्यासाठी सध्याची योग्य वेळ आहेअसे राज्यपालांनी नमूद केले. भारत आणि युरोपियन संघ यांच्यात मुक्त व्यापार करार‘ करण्याबाबत वाटाघाटी सुरू आहेत. या करारामुळे व्यापारातील अडचणी कमी करण्यात मदत होईल आणि वस्तूसेवा आणि गुंतवणुकीच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन मिळेल. युरोपमधील देशांना भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता युरोपीय देशांमधून देखील अधिकाधिक पर्यटक भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत भारतीय चित्रपट उद्योगाच्या शक्तीचा पर्यटन वाढविण्यासाठी उपयोग करावा, असेही त्यांनी सांगितले. 

दरवर्षी भारतात भव्य युरोपियन युनियन‘ सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करावे. तसेच नमस्ते इंडिया‘ आणि महाराष्ट्र महोत्सव‘ हे कार्यक्रम युरोपियन युनियन देशांमध्येही आयोजित करावे, असे राज्यपाल बैस यांनी सांगितले. युरोपियन युनियन देशांच्या ४५०० कंपन्या भारतात कार्यरत असून त्या एकूण ६० लाख लोकांना रोजगार देत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत काळात भारत – युरोपियन युनियन संबंध अधिक दृढ होतीलअसा विश्वास अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी व्यक्त केला. युरोपियन युनियन चेम्बर्सचे अध्यक्ष पियुष कौशिक यांनी चेम्बर्सच्या कार्याची माहिती दिली, तर संचालिका डॉ. रेणू शोम यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला चित्रपट निर्माते दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरायुरोपियन युनियन चेम्बर्सचे उपाध्यक्ष रॉबिन बॅनर्जी यांसह व्यापार व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा:

“सरकारला लाज कशी वाटत नाही?” राज्याच्या दरडोई उत्पन्नावरून Jitendra Awhad यांचा Maharashtra Government ला सवाल

तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, Nana Patole यांची Maharashtra Government कडे मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss