उद्या मुंबईमध्ये लिंगायत समाजाचा महामोर्चा

उद्या मुंबईमध्ये लिंगायत समाजाचा महामोर्चा

मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidana) हा राज्यव्यापी महामोर्चा निघणार असून लाखो लिंगायत बांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत. शिवाय या मोर्चात लिंगायत समाजामधील (Lingayat community) खासदार आणि आमदार देखील सहभागी होणार असणार असल्याची माहिती अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली आहे. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी, केंद्र आणि राज्य सरकारने अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातून (Sangli district) सुमारे एक लाख लिंगायत बांधव सहभागी होणार आहेत, अशी माहिती लिंगायत महामोर्चा समन्वय समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष सुधीर सिंहासने यांनी दिली. याबरोबरच या मोर्चात धर्मगुरुंसह लिंगायत समाजातील सोलापूर जिल्ह्यातील नेते मंडळी देखील सहभागी होणार आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील दहा हजार लिंगायत समाजबांधव या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती लिंगायत समन्वय समितीचे राज्य महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी दिली.

या राज्यव्यापी मोर्चामध्ये राज्यातील लिंगायत बांधवांसह कर्नाटक (Karnataka), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि तेलंगणा (Telangana) राज्यातील लिंगायत समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती लिंगायत समन्व्यय समितीने दिली. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी, राज्यातील लिंगायत धर्मीयांनाही अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा, सोलापुरातील मंगळवेढा येथे मंजूरअसलेल्या महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरु करण्यात यावे, महात्मा बसवेश्वर (Mahatma Basaveshwar) आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे इत्यादी मागण्यासांठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे विजयकुमार हत्तुरे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Budget 2023, यंदाच्या अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाची घोषणा?

आळंदीतील इंद्रायणी नदीत साबणाच्या फेसासारखे पाणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version