मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! हार्बर चा प्रवास आता जलद होणार..

लोकल फेऱ्या वाढवल्याने प्रवाशांना होणारा नाहक त्रास आता कमी होणार आहे. आणि त्यामुळे नागरिकांचा काही वेळ वाचवणार असून त्यांचा प्रवास हा सुखकर होणार आहे. 

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! हार्बर चा प्रवास आता जलद होणार..

मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल (Mumbai Railway ).. लोकलने लाखो प्रवासी आपला प्रवास करतात. त्याच प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता अधिक वेगाने होणार आहे. मध्य रेल्वेने टिळकनगर ते पनवेलदरम्यान लोकल फेऱ्यांच्या वेगवाढीला मंजूरी दिली आहे. यामुळे आता सीएसटी ते पनवेल प्रवास अवघ्या ७६ मिनिटांमध्ये होणार आहे. तर सीएसटी ते बेलापूर प्रवासाला फक्त ६१ मिनिटे लागणार आहेत. त्यामुळे सध्याच्या तुलनेत नागरिकांचे ३ ते ४ मिनिट शिल्लक राहणार आहेत.

 

टिळकनगर ते पनवेलदरम्यान लोकल फेऱ्यांसाठी आणि रुळांच्या बळकटीसाठी यांत्रिक कामे करण्यात आली होती. तिथे असलेल्या काही अनधिकृत बांधकामे हटवण्याचे कामही रेल्वे प्रशासानाकडून करण्यात आले. ही कामे पूर्ण झाल्यानंतर लोकलची चाचणी देखील करण्यात आली होती. सध्या हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या ताशी ८० किमी वेगाने धावत आहेत.दररोज मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून सीएसएमटी ते पनवेलदरम्यान १८८ लोकल धावतात. त्याचबरोबर सीएसएमटी ते बेलापूरदरम्यान ७९ लोकल फेऱ्या धावतात आणि सीएसएमटी ते टिळकनगरदरम्यान रेल्वे स्थानकांतील अंतर कमी आहे. मेल- एक्सप्रेसचा वेग वाढवताना कुंपण घालण्यात येत आहे. हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या ताशी १०० पेक्षा अधिक वेगाने चालवणं शक्य होणार आहे. 

त्यामुळे आता रेल्वेचं वेळापत्रक त्याचप्रमाणे आखलं जाणार आहे. लोकल फेऱ्या वाढवल्याने प्रवाशांना होणारा नाहक त्रास आता कमी होणार आहे. आणि त्यामुळे नागरिकांचा काही वेळ वाचवणार असून त्यांचा प्रवास हा सुखकर होणार आहे. 

हे ही वाचा

VIDHAN PARISHAD ELECTION 2024: कोण ठरणार मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ?

VIDHAN PARISHAD ELECTION: मुंबई पदवीधर मतदारसंघ कोणाच्या ताब्यात येणार ? ; जाणूयात सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version