spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेना योग्य माणसाच्या हाती गेली का ? राज ठाकरे म्हणाले…

मुंबईमध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये २०१९ च्या निवडणुकांनंतर बरीच उलथापालथ झाली आहे. निवडणुकीच्या घोषणा होण्याआधीच पक्षांतराच्या घटना समोर आल्या होत्या आणि अनेक राजकीय समीकरणेच बदलली.

मुंबईमध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये २०१९ च्या निवडणुकांनंतर बरीच उलथापालथ झाली आहे. निवडणुकीच्या घोषणा होण्याआधीच पक्षांतराच्या घटना समोर आल्या होत्या आणि अनेक राजकीय समीकरणेच बदलली. मात्र या बदलत्या समिकरणानंतर अनपेक्षित महाविकास आघाडी झाली आहे. महाराष्ट्राने न्यायालयीन लढाई तर पाहिलीच परंतु सर्वात मोठा कहर म्हणजे अडीच वर्षानंतर शिवसेनेत झालेले दोन भाग. शिवसेनेचे दोन भाग झाल्यामुळे लोकांचा राजकारणावरचा विश्वास उठला आहे. यावरच मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना प्रश्न विचारण्यात आले त्यावर राज ठाकरे यांनी एकच वाक्य मध्ये उत्तर दिली आहे.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेन (Maharashtra Navnirman Sena) राजभाषा महोत्सव आयोजित केला होता. या राजभाषा महोत्सवामध्ये मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. राज ठाकरे काय वाचतात? असा मुलाखतीचा विषय होता. त्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी उत्तर दिले की ते देखील एका शब्दात. चेहरे वाचतात असे राज ठाकरे म्हणाले . या उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. मराठी भाषेबद्दल आणि आवडीच्या पुस्तकांबद्दल राज ठाकरे यांनी माहिती दिली.

सध्या चालू असलेल्या शिवसेनेतील बंडाळी आणि निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाबाबतीत राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. शिवसेनेचं हे चांगले झाले का? योग्य माणसाच्या हाती शिवसेना गेली का? तुम्हाला काय वाटते असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. या प्रश्नांवर राज ठाकरे यांनी स्पष्ट उत्तर दिले आणि ते म्हणाले मला कोणताही टिझर किंवा ट्रेलर सांगायचं नाहीये.मी २२ तारखेला सिनेमा दाखवणार आहे असे राज ठाकरे यांनी सांगितले. कोण कोणत्या पक्षात आहे कोण कोणत्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही त्यावेळी मला कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळत नव्हते असे राज ठाकरे म्हणाले. मला आमच्या राजू पाटील यांना विचारायचे आहे की घेता का. एकदा घेऊन बघा म्हणजेच तुम्हाला कळेल की आमचं काय जळत ते. दिवसरात्र आम्ही बर्नर लावत असतो असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले. त्यानंतर मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही सोशल मीडिया (Social media) वर मीम्स (Memes) पाहता का त्यावर ते म्हणाले हो ने पाहतो आणि एन्जॉय करतो. मला ते आवडतात आणि राज ठाकरे यांनी एका विनोदी मीम्स बद्दल सुद्धा सांगितले.

हे ही वाचा :

आपल्या माय मराठीने अभिजात भाषेचे चारही निकष पूर्ण केले तरीही…, छगन भुजबळ

विधीमंडळ सभागृहाच्या नियम, प्रथा-परंपरांचे पालन योग्य प्रकारे होत नाही, अजित पवार

Maharashtra Assembly Budget Session, आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; सत्ताधारी-विरोधक आमने सामने

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss