मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग, नागरिकांचे प्रचंड हाल

सकाळ पासून होणाऱ्या पावसामुळे उपनगरीय रेल्वेवर ही परिणाम झाला आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईला पावसाने झोडपले आहे. शिवाय विदर्भालाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग, नागरिकांचे प्रचंड हाल

मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच ( दि.१९जुलै ) पावसाने धुमाकूळ घातला आहे. जराही विश्रांती न घेता पाऊस सतत कोसळत आहे. त्यातच पुढील २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळ पासून होणाऱ्या पावसामुळे उपनगरीय रेल्वेवर ही परिणाम झाला आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईला पावसाने झोडपले आहे. शिवाय विदर्भालाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये मुख्य काही क्षेत्रांना पावसाचा अलर्ट सांगण्यात आला आहे. त्याच सोबत कालपासून पडणाऱ्या या पावसामुळे वेस्टर्न, सेंट्रल आणि हर्बल रेल्वे १५ ते २० मिनिट उशिराने धावत होत्या. ज्यामुळे नोकरदार वर्गाचे हाल होत आहेत.

कल्याण-डोंबिवली परिसरात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दीड दोन तासांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे स्टेशन परिसर जलमय झाल्याचे पाहायला मिळालं आहे. कल्याण रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या महापालिकेच्या वाहन तळासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे तर पाहायला मिळालं त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांची, वाहन चालकांचे मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. महापालिकेचे पथक या ठिकाणी दाखल झाले असून महापालिकेने तीन पंप लावून या पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू केले आहे.

तसेच भिवंडी शहरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे भिवंडी शहरातील अनेक सकल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच भिवंडी भाजी मार्केटमध्ये अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. भिवंडीमध्ये पावसाचं जोर कायम राहिल्यास अनेक घर व दुकानांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. नवी मुंबईमध्येही पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. रात्रीपासून रिमझिम सरी मात्र सकाळी पावसाचा जोर वाढला होता. नवी मुंबई येथील एपीएमसी बाजारात सर्वत्र पाणी भरले असून सानपाड्यातही सबवेमध्ये ही गुडघाभर पाणी साचले असून नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

Dharavi Redevelopment Project: मुंबईतील सर्व जमिनींचे अधिकारच अदानीला देण्याचा BJP सरकारचा प्रयत्न: Nana Patole

HEAVY RAINFALL : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; Tulsi lake भागवणार मुंबईकरांची तहान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version