पुढील पाच दिवस मुंबईत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये पावसाचा जोर दिसून येत आहे. तर काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

पुढील पाच दिवस मुंबईत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये पावसाचा जोर दिसून येत आहे. तर काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. मागील दोन ये तीन दिवसांपासून मुंबई आणि नवी मुंबईमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. परंतु आज सकाळपासूनच मुंबई त्याचबरोबर ठाणे जिल्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर मुंबई, उपनगर परिसरात सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर दिसून येत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर आज वाढला आहे. तर अंधेरी सबवे पाणी साचल्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे, सबवेखाली दीड ते दोन फूट पाणी साचलं आहे.

मुंबईमधील सखल भागांमध्ये पाणी वाचायला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भासह कोकणामध्ये सुद्धा पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर राज्याच्या उर्वरित भागांमध्ये पावसाचा जोर वाह्द्त चालला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाची हजेरी असणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा आणि इतर काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याचे पुढेच ४-५ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि इतर काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच कोल्हापूर, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह पश्चिम उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव,मालाड, कांदिवली,बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुज, वांद्रे या परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच सायन परिसरातही पाऊस सुरु आहे. जर काही वेळा असा जोरदार पाऊस सुरु राहिला तर पश्चिम उपनगरात सखल भागच ठिकाणी पाणी भरायला सुरुवात होईल. दरम्यान, अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळे सबवे खाली दीड ते दोन फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू तुम्हाला माहित आहे का? तेंडुलकर, कोहली आणि विराटला सुद्धा टाकले मागे

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर

अशोक मामांबद्दल खुद्द निवेदिता सराफ यांनी केला खुलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version