HEAVY RAINFALL : पावसाने वाजवले मुंबईचे तीनतेरा; Grant Road परिसरात इमारतीचा काहीभाग कोसळून घडली दुर्घटना

HEAVY RAINFALL : पावसाने वाजवले मुंबईचे तीनतेरा; Grant Road परिसरात इमारतीचा काहीभाग कोसळून घडली दुर्घटना

मुंबईमध्ये कालपासून ( १९जुलै ) पावसाने थैमान गाजवताना दिसत आहे. जराही विश्रांती न घेता पाऊस सतत कोसळत आहे. त्यातच पुढील २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळ पासून होणाऱ्या पावसामुळे उपनगरीय रेल्वेवर ही परिणाम झाला आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईला पावसाने झोडपले आहे. शिवाय विदर्भालाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये मुख्य काही क्षेत्रांना पावसाचा अलर्ट सांगण्यात आला आहे. त्याच सोबत कालपासून पडणाऱ्या या पावसामुळे वेस्टर्न, सेंट्रल आणि हर्बल रेल्वे १५ ते २० मिनिट उशिराने धावत आहेत. ज्यामुळे नोकरदार वर्गाचे हाल होत आहेत.

त्यातच आता ग्रँट रोड परिसरातील एका इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ग्रँट रोड येथील रुबिनिसा मंझिल या इमारतीचा भाग कोसळून ही दुर्घटना घडली आहे. ग्रँट रोड (पश्चिम) येथील रेल्वे स्थानकाजवळील स्लेटर रोड येथे रुबिनिसा मंझिल नावाची चार मजली इमारत आहे. ही म्हाडाची इमारत आहे. याच इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या निवासी इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला आहे.

या इमारतीसाठी म्हाडाने कुठल्याह प्रकारची नोटीस जारी केली नसल्याची माहिती आहे. याला लेव्हल I कॉल घोषित करण्यात आला आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ग्रँड रोड स्टेशनच्या समोरील नाना चौक येथे इमारतीचा काही भाग कोसळला ज्यामुळे काहीप्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठीचे बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

जुन्नर मधून AJIT PAWAR यांना बसला दणका ; शरद पवारांच्या गटात सामील झाले ‘हे’ आमदार

VIDHANSABHA ELECTION मधील दोन निवडणूक चिन्ह गोठवली ; SHARAD PAWAR यांना मिळाला मोठा दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version