spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Heavy Rainfall : Central Railway ची वाहतूक खोळंबली ; नोकरदारांचे रेल्वे ट्रेक

सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक जिल्हे, त्यातील नद्या, नाले हे दुथडीभरून वाहू लागले आहेत. त्यामुळे या सलग पावसाचा त्रास हा मुंबईकारांना भोगावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरु असलेल्या पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. राज्यात गुरुवारी सर्वत्र पावासाचा धुमाकूळ सुरु आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक शहरांमधील पाणी वस्त्यांमध्ये घुसले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यनमध्ये शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबईकरांची लाईफलाईन असलेली रेल्वेसेवाही विस्कळीत झाली आहे. अश्यातच आता मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची रखडपट्टी झाल्यानं प्रवाशांना रेल्वे ट्रॅकव्हर उतरून पायपीट करावी लागत आहे. यामुळे चाकरमानी मोठ्याप्रमाणावर त्रस्त झाले आहेत.

साधारणतः ओव्हर हेड वायरवर (Over Head Wire) बांबू पडल्यानं सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व फास्ट लोकल (Fast Local) माटुंग्याला (Matunga Station) खोळंबलेल्या. सर्व लोकल एकापाठोपाठ एक थांबल्या होत्या. एवढंच नाहीतर काही एक्सप्रेस गाड्याही थांबल्याचं पाहायला मिळालं होतं. वेळत ऑफिस गाठण्यासाठी लोकलमधील प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून पायपीट सुरू केली.ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या ओव्हरहेड वायरवर पडलेला बांबू काढण्यात यश आलं आहे. पण तरिदेखील मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं सुरू आहे.

माटुंगा स्टेशननजिक एक कन्स्ट्रक्शन साईट आहे. या कन्स्ट्रक्शनसाठी काही बांबू वापरण्यात आले आहेत. त्यापैकीच काही बांबू पडून रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळले. त्यामुळे रेल्वेचा खोळंबा झाला. या घटनेमुळे मोठा अपघात होता होता राहिल्याचंही बोलंल जात आहे. सध्या ओव्हरहेड वायरवरील बांबू दूर करण्यात यश आलं असलं तरीदेखील, प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे. अजूनही रेल्वेसेवा विस्तळीत असून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे. ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यामुळे मध्य रेल्वेवर मोठी दुर्घटना घडता घडता राहिली. ऐन कामाच्या वेळी रेल्वे खोळंबल्यानं प्रवाशांनी ट्रॅकवर उतरुन पायपीट सुरू केली. सर्व फास्ट लोकल माटुंग्याला एकापाठोपाठ एक उभ्या होत्या. तर काही एक्सप्रेस गाड्याही खोळंबल्या होत्या.

हे ही वाचा:

heavy rainfall : पावसाने पळवले मुंबईकरांच्या तोंडचे पाणी ; रेल्वे वाहतुकीवर झाला परीणाम

heavy rainfall : पावसामुळे नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी ; जनजीवन झाले विस्कळीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss