मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत तर एकाचा मृत्यू

गोरेगाव (Goregaon) पश्चिम येथील ओल्ड बीएमसी कॉलनी येथे झाडांची फांदी घरावर कोसळल्याने एका तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत तर एकाचा मृत्यू

जून महिन्याच्या मध्यंतरा पर्यंत सर्वजण प्रचंड मान्सूनची वाट बघत होते. शेवटी जून महिनाच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून मुंबईसह संपूर्ण राज्यात दाखल झाला. मान्सूनच्या आगमनाने सर्वांनाच उष्णतेपासून प्रचंड दिलासा मिळाला. परंतु गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे मुंबई आणि मुंबई लगतच्या परिसरात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक भागात प्रचंड पाणी सुद्धा साचले आहे. तसेच हवामान खात्याकडून काही भागांना अलर्टस जारी करण्यात आले आहेत.

दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. आज दुपारच्या सुमारास पावसाने थोड्या वेळासाठी विश्रांती घेतली होती. परंतु, सायंकाळच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली. आज रात्रीदेखील मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. गोरेगाव (Goregaon) पश्चिम येथील ओल्ड बीएमसी कॉलनी येथे झाडांची फांदी घरावर कोसळल्याने एका तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. झाडाची फांदी घरावर पडल्यानंतर हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी जवळच्या प्रार्थना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले. येणाऱ्या दिवसात अशा घटना घडू नये म्हणून प्रशासनाने आता कंबर कसली आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रातील (Mumbai Regional Meteorological Station) तज्ज्ञ सुषमा नायर (Sushma Nair) यांनी म्हटले की, कोकण किनारपट्टी परिसरात ढगांची दाटी आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, मुंबईत घरावर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

BREAKING, Aditya Thackeray यांच्या कारला बाईकची धडक!

Ambernath West परिसरात रस्ते जलमय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Exit mobile version