spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २२ हजार खारफुटीची झाडं तोडण्यास हायकोर्टाची सशर्त परवानगी

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील (Bullet Train Project) आणखीन एक अडसर दूर झाला आहे. मुंबई, पालघर आणि ठाणे (Mumbai Thane Palghar) या पट्ट्यातील २२ हजार खारफुटीची झाडं तोडण्यास हायकोर्टानं (Bombay High Court) परवानगी दिली आहे.

Mumbai-Ahmadabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील (Bullet Train Project) आणखीन एक अडसर दूर झाला आहे. मुंबई, पालघर आणि ठाणे (Mumbai Thane Palghar) या पट्ट्यातील २२ हजार खारफुटीची झाडं तोडण्यास हायकोर्टानं (Bombay High Court) परवानगी दिली आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशननं (Mumbai Ahmedabad high speed rail corridor) याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सार्वजनिक हितासाठी ही परवानगी दिली जात असल्याचं स्पष्ट करत या खारफुटी तोडल्यामुळे होणारी नुकसानाची भरपाई म्हणून २.५ लाख रोपांची लागवड करण्याची अट हायकोर्टानं कंपनीला आहे.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. ०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा १५५ कि.मी लांबीचा पट्टा हा महाराष्ट्रातून जात आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील २१ ते २३ कि.मी लांबीच्या जागेवरील कांदळवन तोडणं आवश्यक होतं. त्यानुसार या प्रकल्पासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथील हजारो कांदळवन तोडली जाणार असून ठाण्यातील हरितपट्टाही प्रभावित होणार आहे. या प्रकल्पासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथील कांदळवन तोडले जाणार असून ठाण्यातील हरितपट्टाही प्रभावित होणार आहे. परंतु हा सार्वजनिक प्रकल्प असल्याने केंद्र सरकारच्या र्यावरण व वन मंत्रालयाने या पट्ट्यातील सुमारे २२ हजार खारफुटीची झाडे तोडण्यास परवानगी दिली होती. यापूर्वी ५३ हजार ४६७ खारफुटी तोडण्यात येणार होती. मात्र आकडा नंतर २१ हजार ९९७ एवढा कमी करण्यात आल्याची माहिती कंपनीने न्यायालयाला दिली होती. तसेच खारफुटी तोडण्यासाठी परवानगी देताना घालण्यात आलेल्या परवानगीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि नुकसान भरपाई म्हणून दोन लाख रोपांची लागवड करण्याचे आश्वासन कंपनीतर्फे न्यायालयाला देण्यात आले.

 

मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठानं आपला राखून ठेवलेला निकाल शुक्रवारी जाहीर केला. एनएचआरसीएल कंपनीची खारफुटीची झाडे तोडू देण्याची मागणी मान्य करताना हायकोर्टानं त्यांना पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं दिलेल्या मंजुरीमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींचे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कांदळवन तोडण्याची परवानगी मिळालेली नाही, असा दावा करत बॉम्बे एन्व्हायर्नमेंट ॲक्शन ग्रुप या संस्थेच्यावतीनं हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यातनं झाड कापण्याची परवानगी न देण्याची मागणी करण्यात आली होती. प्रकल्प उभारणीसाठी काही ठिकाणी केमिकल स्फोटकांचा वापर करण्यात येणार आहे. मात्र, तो परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेश (इको सेंन्सिटिव्ह झोन) मध्ये मोडतो. याशिवाय तिथं उभारण्यात येणारं ठाणे स्थानक हे मुळात ठाणे जिल्ह्याच्या बाहेर आहे. ठाण्यातील हा परिसर फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी आरक्षित आहे.

हे ही वाचा : 

Shraddha Walkar श्रद्धा वालकरच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेत व्यथा मांडली, आफताबला कठोर शिक्षा देण्याची केली मागणी

Christmas 2022 : कशा पद्धतीने साजरा केला जातो ख्रिसमस, घ्या जाणून

गुजरात निवडणूक ठरली ‘आप’ साठी फायदेशीर ! जाणून घ्या कसा मिळतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss