spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संविधान मंदिराच्या माध्यमातून संविधान निर्मितीचा इतिहास युवा पिढीला समजावा, हाच आमचा प्रयत्न – Mangal Prabhat Lodha

मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माहिती दिली. कौशल्य विकास विभागामार्फत राज्यातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये ‘संविधान मंदिर लोकार्पण ‘ हा कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील एक हजार महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र शुभारंभ’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना शुभारंभ’ प्रधानमंत्री नरेंद मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते दि. २० सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

संविधान मंदिर लोकार्पण सोहळा

राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या संविधान मंदिर लोकार्पण कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड व राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा  यांच्या उपस्थितीत रविवार १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला आपल्या भारतीय संविधानाची शिकवण  देण्यात येणार असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या पिढीला माहिती व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मंत्री लोढा म्हणाले, “अनेक कौशल्य संपन्न आणि नीतिमंत व्यक्तिमत्वांनी आपल्या भारत देशाला घडवण्यासाठी आपले योगदान दिले. आज त्यांच्या मेहनतीमुळे आपण आजवर इतकी प्रगती करू शकलो आहोत. संविधान मंदिराच्या माध्यमातून संविधान निर्मितीचा इतिहास, त्याचे महत्व, येणा-या पिढीला समजावे हा आमचा प्रयत्न आहे. येणारा काळ हा युवाशक्तीचा आहे, भारतातील युवकांसाठी सुवर्ण संधींचा आहे. संविधान मंदिर आणि महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र उभे करण्यामागे आमचा हाच उद्देश आहे. नक्कीच युवकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.  उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमास येण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो!” यावेळी  कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विकास नाईक उपस्थित होते.

हे ही वाचा:

Malaika Arora Father Death: मलायकाच्या वडिलांचे नाव नेमके काय? दोघांच्या वयातील अंतर पाहून व्हाल चकित…

Ganeshotsav 2024: गौरी विसर्जन कोणत्या कालावधीत करायचे आणि कोणते नियम पाळायचे आहेत ते जाणून घेऊयात सविस्तर…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss