कशी असेल मुंबई मेट्रो लाइन्स 2A आणि 7 ची सुविधा

कशी असेल मुंबई मेट्रो लाइन्स 2A आणि 7 ची सुविधा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर (visit to Mumbai) आले होते. तसेच आज पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Mod) हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांना चालना मिळाली. तसेच पूर्ण झालेल्या विकास कामांचे उद्घाटन सुद्धा त्यांनी केलं आहे. यामध्ये सर्वांचं लक्ष लागले होते ते म्हणजे मुंबई मेट्रो लाइन्स २ए आणि ७ (Metro Lines 2A and 7) चे उद्घटनांबाबत. पंतप्रधान सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत. यामध्ये दोन मेट्रो लाइन्सचा समावेश आहे. मोदी मुंबईमध्ये (Mumbai) संध्याकाळी ६ वाजता अंदाजे १२ हजार ६०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या दोन मेट्रो लाइन्सचं उद्घाटन करतील. २० जानेवारीला संध्याकाळी चार वाजल्यापासून या दोन्ही लाइन्स नागरिकांसाठी खुल्या होणार आहेत. याशिवाय, पंतप्रधान आज ‘मुंबई १’ हे मोबाइल अ‍ॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचंही (National Common Mobility Card) (मुंबई १) उद्घाटन केलं. त्याचा वापर मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वारावर यूपीआयच्या (UPI) माध्यमातून तिकीट खरेदीसाठी करता येणार आहे.

मेट्रो लाइन २ए (पिवळी लाइन) ही अंधेरी पश्चिमेच्या दहिसर पूर्व आणि डीएन नगर या दोन ठिकाणांना जोडते. या मार्गाची लांबी सुमारे १८.६ किलोमीटर इतकी आहे. दुसरा टप्पा अंधेरी पश्चिम ते वलाणीपर्यंत नऊ किलोमीटरने वाढवण्यात आला असून, त्यात आठ स्थानकं आहेत. १६.५ किलोमीटर लांबीची मेट्रो लाइन ७ ही अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्वेला जोडते. त्याच्या ५.२ किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्यात गोरेगाव पूर्व ते गुंदवलीपर्यंत चार स्थानकं वाढवण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोन मेट्रो मार्गांमध्ये अंधेरी पूर्व (Andheri East) आणि अंधेरी पश्चिम (Andheri West) इथल्या गुंदवली (Gundvali) इथे नवीन इंटरचेंज स्टेशन असेल. पहिली मेट्रो अंधेरी पश्चिम स्थानकावरून सकाळी सहा वाजता लाइन २ए वर धावेल आणि शेवटची मेट्रो रात्री ९.२४ वाजता असेल. लाइन ७ ची पहिली मेट्रो सकाळी ५.५५ वाजता गुंदवली स्थानकावरून सुरू होईल आणि शेवटची मेट्रो ९.२४ वाजता असेल. पहिल्या तीन किलोमीटरसाठी १० रुपये तिकीट असेल आणि तीन किलोमीटरनंतर अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (Western Express Highway) या दोन महत्त्वाच्या रस्त्यांवरून जातात. या दोन्ही मार्गांमुळे दररोज तीन-चार लाख प्रवाशांची वाहतूक, रहदारी आणि गर्दी कमी होणं आणि प्रवासाचा वेळ किमान ३० ते ५० टक्क्यांनी कमी होणं आदी बाबी अपेक्षित आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या पक्षालाच दोष दिला! नाना पटोलेंचा हल्लाबोल

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप नंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version