Mukhyamantri Majhi Ladki Bahin सन्मान यात्रेला उदंड प्रतिसाद, Worli विधानसभेतून भरले ‘इतके’ अर्ज

Mukhyamantri Majhi Ladki Bahin सन्मान यात्रेला उदंड प्रतिसाद, Worli विधानसभेतून भरले ‘इतके’ अर्ज

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या संकल्पनेतून आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान यात्रा’ शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह (Susieben Shah) यांच्या माध्यमातून व माजी नगरसेविका मानसी दळवी यांच्या प्रयत्नाने वरळी (Worli) विधानसभेतील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा, यासाठी फिरत्या रथाची व्यवस्था करण्यात आली होती. वरळी विधानसभेत वरळी नाका व जांभोरी मैदान येथे फिरता रथ फिरवून योजनेचा अर्ज भरण्यात आला. एकाच दिवशी २०० हून अधिक अर्ज दाखल झाले

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अर्ज  ज्या महिलांनी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरलेले नाहीत त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच ज्यांचे अर्ज भरण्यात आले आहेत, पण ते कागदपत्राच्या त्रुटीमुळे रद्द झाले, अशा अर्जामध्ये सुधारणा करून देण्यात आली. अनेक महिलांनी आपले ऑनलाईन फॉर्म अंगणवाडी सेविकांद्वारे भरून घेतले. वरळी नाका येथे १५० हून अधिक अर्ज भरण्यात आले आणि जांभोरी मैदान येथे ५० हून अधिक अर्ज भरण्यात आले.

आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह १५०० रुपये जमा होणार आहेत. २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. ३१ जुलै पूर्वी ज्या महिलांनी अर्ज भरला, त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. परंतु काही महिलांनी अजून अर्ज भरला नाही. तसेच कागदपत्रांच्या त्रुटीमुळे अर्ज रद्द झाला असेल त्या महिलांनी सन्मान यात्रेच्या फिरत्या रथाचा लाभ घेऊन योजनेचा अर्ज भरावा, अशी माहिती ॲड. सुशीबेन शाह यांनी दिली. याप्रसंगी, उपविभाग प्रमुख रेणुका तांबे व शाखा प्रमुख श्रीकांत जावळे यांनी आयोजन केले. तसेच धनंजय तांबे, युवती उपविभाग प्रमुख निकिता मर्चंडे, युवती शाखा प्रमुख १९६ रेणुका गौतम यांचे सहकार्य लाभले.

हे ही वाचा:

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version