spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वरळीमधून तुमच्याविरूद्ध अमित ठाकरे लढले तर..? आदित्य ठाकरे, म्हणाले…

लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष हे विधानसभेच्या निवडणूकीकडे लागले आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष हे विधानसभेच्या निवडणूकीकडे लागले आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. यासंदर्भातच आदित्य ठाकरे tv9 मराठीच्या मुलाखतीत अनेक प्रश्न हे विचारण्यात आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यंदा वरळीमधूनही ते आपला उमेदवार देणार आहेत, असं आदित्य ठाकरेंना विचारण्यात आलं. यावर बोलताना, अनेक उमेदवार उतरतात. १५ ते २० उमेदवार निवडणूक लढवतात. अनेक लोक येत असतात. पंतप्रधान मोदींना तीनदा कमी मते मिळाली. आमच्या उमेदवारांना असं काही घडत नाही. पाच वर्ष सातत्याने काम करणारे पक्ष असतात. काही पक्ष निवडणुकीला उठतात. मी मनसेवर टीका करणार नाही. मी वरळीतूनच लढणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर जर राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना वरळीमधून उमेदवारी देण्याबाबत विचारण्यात आलं.

मविआमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बाबत आदित्य ठाकरे याना विचारलं असता ते पुढे म्हणाले आहेत की, त्यांच्यातून चेहरा कोण,. ते जिंकत नाहीत. हाच चेहरा घेऊन ते जाणार आहेत का. त्यांचं सरकार आहे. त्यांनी सांगावं. आम्ही आमची भूमिका मांडली. उद्धव ठाकरे हा आमचा चेहरा आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. लोक त्यांना पालक म्हणून पाहत आहे. पण महायुतीकडे चेहरा कोण आहे. जे योजनेच्या क्रेडिटवरून भांडतात ते आम्हाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे विचारत आहे असल्याचं म्हणतात महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांवर निशाणा साधला. जरतर वर बोलण्यात अर्थ नाही. वरळी माझा मतदारसंघ आहे. सरकारमध्ये असताना मी कधीच कोणत्याही मतदारसंघावर अन्याय केला नाही. गुंतवणूकदारांना सांगायचो महाराष्ट्र आमचा आहे. प्रत्येक जिल्हा आमचा आहे, सर्वांना रोजगार द्या, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

वरळी विधानसभा मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत. आदित्य ठाकरे हे गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी वरळीमधून बिनविरोध निवडून गेले होते. ठाकरे गटाकडून तशी रणनीती आखण्यात आली होती. ठाकरे गटाने त्यावेळी बिनविरोधसाठी केलेला प्रयत्न यशस्वी ठरला होता. पण यावेळी वातावरण भरपूर वेगळं असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्या समोर नेमकं कोण असणार अश्या चर्चा चालू आहेत.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde यांच्या हस्ते मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष” लोकार्पण सोहळा संपन्न

महाराष्ट्राचा स्वाभिमान मोदीकडे गहाण ठेवू नका, राज्यात मविआचे सरकार आणा: Mallikarjun Kharge

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss