Thursday, September 26, 2024

Latest Posts

आयआयटी मुंबई वादाच्या भोवऱ्यात, प्रवेश शुल्कातून वसूल करणार दंड

आयआयटी मुंबईत (IIT Bombay) शाहाकारीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागी मांसाहार करणाऱ्या विध्यार्थ्यांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयआयटी मुंबईत (IIT Bombay) शाहाकारीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागी मांसाहार करणाऱ्या विध्यार्थ्यांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच पुढील प्रवेश शुल्कामधून हा दंड वसूल करण्यात येणार आहे असे विद्यार्थ्याना ई-मेलद्वारे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी १२ , १३ आणि १४ क्रमांकाच्या वसतिगृहाच्या खानावळीतील सहा टेबल शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. याचा निषेध म्हणून काही विद्यार्थ्यांनी शाकाहारासाठी (Vegetarian) राखीव टेबलवर बसून मांसाहार केला. त्यातील एका विद्यार्थ्याला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

शाकाहारींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेवर बसून मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्याला दहा हजारांचा दंड ठोठावल्याने आयआयटी मुंबई वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. शाकाहारींसाठी राखीव असलेल्या जागी बसून मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्याला आयआयटी मुंबईत दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी आयआयटी मुंबईतील मेसमध्ये मांसाहारास बंदी असल्याचा फलक लावण्यात आला होता. संस्थेच्या या निर्णयानंतर विद्यार्थी संघटनांनी फलकावर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर अखेर प्रशासनाने असा कोणताही नियम नसल्याचे स्पष्ट केले होते.

काही दिवसांपूर्वी १२, १३, १४ नंबरच्या वसतिगृहाचे टेबल खानावळीतील सहा शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांना ई- मेलद्वारे कळविण्यात आले होते. त्यानंतर एका विद्यार्थ्याने खानावळी समन्वय समिती आणि अधिष्ठातांना मेल करून हा निर्णय चुकीचा व भेदभाव करणारा असल्याचे सांगितले. या निर्णयावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असून शाकाहारासाठी राखीव टेबलवर बसून मांसाहार करणार असे ई – मेलद्वारे कळवण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss