spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईकरांसाठी महत्वाची माहिती!, ‘हा’ महत्वाचा मार्ग आहे बंद

अंधेरी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या गोखले पूलाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व-पश्चिम अशी येजा करण्यासाठी अंधेरी सबवे या मार्गे प्रवास केला जातो.

नुकताच राज्यभरात मान्सून दाखल झाला आहे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि मुंबईलगतचच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच हवामान खात्याकडून अनेक ठिकाणी अलर्टस जाहीर करण्यात आले आहेत. सतत पडणाऱ्या पावसाने मुंबई आणि ठाणे शहराला चांगलंच झोडपून काढलं आहे. अशातच जोरदार पावसामुळे मुंबईतील महत्वाचा मार्ग आता बंद करण्यात आला आहे.

मुंबईतील अंधेरी परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. शनिवारी दिनांक २४ जून रोजी झालेल्या पावसामुळे या अंधेरी सबवे मध्ये (Andheri Subway) मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. या पाण्यात अनेक गाड्या अडकल्या होत्या. त्यामुळे आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेत पालिका प्रशासनाने हा अंधेरी सबवे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत मान्सून दाखल झाल्यापासून अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. म्हणूनच शासन आता मोठ्या प्रमाणात खबरदारी घेत आहे. सोबतच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी मिठी नदी परिसराची पाहणी केली. इक्बाल सिंह चहल यांनी यावेळेस पावसाळी उपययोजनांबाबत माहिती घेतली.

अंधेरी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या गोखले पूलाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व-पश्चिम अशी येजा करण्यासाठी अंधेरी सबवे या मार्गे प्रवास केला जातो. पण पावसामुळे हा सबवे बंद करण्यात आलाय. त्यामुळे आता जोवर पाण्याचा निचरा होत नाही, तोवर अंधेरी सबवे मार्ग खुला केला जाणार नाही. त्यामुळे आता मुंबईकरांना जेव्हीएलआर (ट्रॉमा सेंटर), कॅप्टन गोर उड्डानपूल (विलेपार्ले) आणि मिलन सबवे या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागेल.

हे ही वाचा : 

ईद साजरी करण्यासाठी आणलेल्या बकऱ्यावरून सोसायटीतील सदस्यांमध्ये वाद

भाजपला मोठा धक्का, नाशिकमधील आमदाराच्या भावाचा काँग्रेस मध्ये प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss