spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘सामना’त आली, मोदींच्या कार्यक्रमांची पानभर जाहिरात, चर्चांना आले उधाण

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दि १९ जानेवारी रोजी (गुरुवारी) मुंबईत येत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दि १९ जानेवारी रोजी (गुरुवारी) मुंबईत येत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. यातील विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीचं रणशिंगही या दौऱ्यातून फुंकलं जाणार आहे, असं देखील सांगितलं जातं. तसेच उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटानेही मोदींचा हा सर्व दौरा निव्वळ राजकीय असल्याचं म्हटलं आहे. तसेच महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा दौरा होत असल्याचं म्हटलं आहे. परंतु मोदींच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष हे लागले आहे. परंतु यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणेज ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाची पानभर जाहिरात छापण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वत्र चर्चाना आणखी जास्त उधाण आलं आहे.

उद्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. परंतु ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाची पानभर जाहिरात छापण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मोदींच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या ठाकरे गटाने मोदींच्या कार्यक्रमाची जाहिरात स्वीकारली तरी कशी असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत. आजच्या पहिल्या पानावरच हि सर्व जाहिरात छापण्यात आली आहे. नरेंद्र मोदी हे मोदी कोणकोणत्या विकास कामांचं लोकार्पण करणार, कोणत्या कामाचं भूमिपूजन करणार आणि लाभ वितरणाची माहिती सर्व काही या जाहिरातीत देण्यात आली आहे. या पाहिल्या पानावरच्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भला मोठा फोटो छापण्यात आला आहे. त्यासोबत मेट्रोसह इतर विकास कामांचे फोटोही दाखण्यात आले आहेत. मोदींच्या फोटोच्यावर मुंबईच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी असं हेडिंग दिलं आहे. त्यानंतर एक घोषवाक्यही लोहित आहे आणि त्यामध्ये म्हंटलं आहे की, ‘निर्धार सरकारचा कायापालट मुंबईचा,. याच जाहिरातीत मोदी कोणकोणत्या विकास कामांचं भूमिपूजन करणार आहे त्याची माहिती दिली आहे.

लाभ वितरण – प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज वितरण, २ लाखांहून अधिक फेरीवाल्यांना याचा लाभ होणार

भूमिपूजन –

  • १७,१८२ कोटींचे ७ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे भूमिपूजन (वरळी, वांद्रे, वर्सोवा, धारावी, मालाड, भांडुप, घाटकोपर)
  • प्रतिदिन क्षमता : २४६४ दशलक्ष लिटर. यामुळे ८०% लोकसंख्येला लाभ होणार
  • बृहन्मुंबई महापालिकेच्या ३ रुग्णालयांचे ९,१०८ कोटी खर्चासह बांधकाम व पुनर्विकास (गोरेगाव, भांडुप, ओशिवरा) यामुळे २५ लाख गरजूंना लाभ होणार
  • ६.०७६ कोटी खर्चासह ४०० कि.मी. रस्त्यांचे काँक्रिटीकरण. मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त होणार
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाचा २,८१३ कोटी खर्चासह पुनर्विकास, वारसा वास्तूचे जतन, पार्किंगसाठी जागा आणि इमारती हरित प्रमाणित होणार

लोकार्पण –

  • मेट्रो मार्गिका २ अ (दहिसर पूर्व डी. एन. नगर) १६,४१० कोटी खर्चासह १८.६ कि.मी मार्गिका आणि १७ स्थानके
  • मैट्रो मार्गिका ६ (अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व) १६,२०८ कोटी खर्चासह १६.५ कि.मी. मार्गिका आणि १३ स्थानके
  • बृहन्मुंबई मनपाच्या २० नवीन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे लोकार्पण, मोफत औषधे, वैद्यकीय तपासण्या, मोफत १४७ रक्त चाचण्या, विविध डॉक्टरांचा मोफत सल्ला

वेळ, तारीख आणि स्थळ – त्यानंतर शेवटी या जाहिरातीत कार्यक्रमाची वेळ आणि तारीख देण्यात आली आहे. गुरुवार, १९ जानेवारी वेळ : दुपारी ४ वा, एमएमआरडीए मैदान, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई येथेही सभा होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

तसेच सर्वात शेवटी जाहिरातीच्या तळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्यात आला आहे. आमच्याच विकास कामांचे, आम्ही तयार केलेल्या प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. मोदींची सर्व जाहिरात सामानाच्या वृत्तपत्रातील पहिल्या पानांवर छापून आली आहे. त्यामुळे आता सर्वत्र चर्चाना उधाण आलं आहे.

हे ही वाचा:

हे कायद्याचं राज्य आहे, कोयत्याच नाही!, भाजपने केली जोरदार पोस्टरबाजी

सरकारमध्ये निवडणुका लावण्याची हिंमत नाही, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss