spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समुदायाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबईत गणपती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर येतात. या दिवशी मोठ्या उत्साहात मिरवणूका काढण्यात येतात. दरम्यान २८ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद येत आहे. यामुळे यंदाच्या ईद-ए-मिलाद च्या मिरवणूका या अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी निघणार आहेत.

मुंबईत गणपती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर येतात. या दिवशी मोठ्या उत्साहात मिरवणूका काढण्यात येतात. दरम्यान २८ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद येत आहे. यामुळे यंदाच्या ईद-ए-मिलाद च्या मिरवणूका या अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी निघणार आहेत. मुस्लिम समुदायाकडून याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडीत अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक आणि ईद-ए-मिलादची मिरवणूक एकाच दिवशी एकाच मार्गावर येऊन ठेपणार आहे. यामुळे पोलिसांपुढे पेच निर्माण झाला असून संवेदनशील असलेल्या भिवंडी शहरात या दोन्ही मिरवणुकांचे नियोजन पोलिस अधिकारी आणि मोहल्ला कमिटी कसे करणार आहे, याकडे शहरातील नागरिक आणि गणेशभक्तांचे लक्ष लागले आहे.

या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही समुदायातील बंधुत्व जोपासण्याच्या उददे्शाने तसेच दोन्ही सण निर्विघ्न आणि शांततेत पार पडावेत या उद्देशाने ईदच्या मिरवणूका एक दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत बुधवारी भायखळा येथील खिलाफत हाऊस येथे मुस्लिम प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्येष्ठ मौलवी मौलाना मोईन अश्रफ कादरी (मोईन मियाँ) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत, ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबरला असली तरीही शांतता आणि सौहार्दाच्या हितासाठी जुलूस एक दिवस पुढे ढकलल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. बैठकीला माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आरिफ नसीम खान, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नसीम सिद्दीकी उपस्थित होते.

हे ही वाचा: 

 अजित पवार करणार पुण्यात शक्तिप्रदर्शन

साखरेच्या दरात मोठी वाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss