पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अरे बाबा स्वागत करा…

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहिल्याच पावसामुळे गटारं तुंबून सर्वत्र पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे . याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली. पाऊस झाला याचं स्वागत करा असं शिंदे म्हणाले आहेत.

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अरे बाबा स्वागत करा…

काल दिनांक २३ जून पासून मुंबई आणि मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने त्याची दमदार हजेरी ही लावली आहे. २९ जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने (India Meteorological Department ) वर्तवली आहे. परंतु काल रात्री पासूनच मुंबईतील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अंधेरी, कुर्ला, दादर, वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, लालबाग, परळ, भायखळा, विलेपार्ले या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच नवी मुंबईसह, ठाणे परिसरात देखील पावसानं दमदार हजेरी लावली आहे. परंतु पावसाच्या या आगमनामुळे मुंबईची पहिल्याच दिवशी तुंबई ही झाली आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहिल्याच पावसामुळे गटारं तुंबून सर्वत्र पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे . याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली. पाऊस झाला याचं स्वागत करा असं शिंदे म्हणाले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते शनिवारी दिनांक २४ जून रोजी मुंबईत मराठा मंदिर अमृत महोत्सवानंतर पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी पत्रकारांनी मुंबईत पहिल्याच पावसानंतर पाणी तुंबल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे बाबा, पाऊस झालं याचं स्वागत करा. पाणी साचलं हे काय. पाऊस झाला त्यावर बोलत नाहीत.”

तसेच एकनाथ शिंदे पुढे म्हणाले आहेत की, आज पाऊसाची चांगली सुरुवात झाली आहे. बळीराजा आणि आपण सगळे त्याचं आनंदाने स्वागत करुयात. गेले अनेक दिवस आपण पावसाची आतुरतेने वाटत पाहत होतो. आज पाऊस चांगला सुरू झाला आहे. राज्यभर पेरण्या झाल्या आहेत. आजचा पाऊस शेतकऱ्यासाठी अतिशय उत्तम आहे. पाऊस झाल्याने सर्वांनाच मनापासून आनंद झाला आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. तसेच उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदे म्हणाले, “सरकारवर दररोज खालच्या पातळीवरील आरोप होत आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्वांवर आरोप केले जात आहेत, पातळीसोडून बोललं जात आहे. हे सर्वजण पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी माझा नातू रुद्रांशलाही राजकारणात ओढलं गेलं. त्या लहान मुलाला राजकारण काय कळतं.”

हे ही वाचा:

आता ईडीमुळे सांगलीत देखील खळबळ, पाच व्यापारी ईडीच्या रडारवर

Sundar Pichai यांनी PM Modi यांच्या डिजिटल इंडियाचे केले कौतुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version