पश्चिम रेल्वेत तरुणाने केले तरुणीसोबत अश्लील चाळे, अश्लील वक्तव्य

पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये (Mumbai Local) एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला आहे.

पश्चिम रेल्वेत तरुणाने केले तरुणीसोबत अश्लील चाळे, अश्लील वक्तव्य

पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये (Mumbai Local) एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणाच्या विरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाड येथे राहणारी ही तरुणी शुक्रारी शुक्रवारी रात्री कामानिमित्त चर्नी रोड येथे लोकलने जात होती. ग्रॅन्ट रोड स्थानक येताच एका तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला आणि अश्लील चाळे, अश्लील वक्तव्य करण्यास त्याने सुरुवात केली. आणि त्या तरुणाने तरुणीला त्रास देण्यात सुरुवात केली. संबंधित तरुणीने आरडाओरडा केला असता त्या तरुणाने लोकलचा वेग कमी होताच उडी मारून पळ काढला.

बुधवारी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये तरुणीने तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. यानंतर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे जाऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरपीएफ, जीआरपी, क्राईम ब्रान्च आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. पोलिस स्थानकात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासत आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबई सुरक्षित मानली जाते. मुंबईत रात्री एक वाजता देखील महिला लोकल ट्रेनमध्ये एकटी प्रवास करु शकते आणि सुरक्षिततेसाठी महिलांच्या डब्यात पोलीस तैनात असतात. मात्र, या घटनेमुळे लोकल गाड्यांमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा सवाल उपस्थित झाला आहे.

हे ही वाचा:

Bank Holidays in July 2023, यंदा जुलै महिन्यात अर्धा महिना राहणार बँका बंद!, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

सोलापुरात चक्क ‘Love Pakistan’ संदेश असलेल्या फुग्यांची विक्री, ईदच्या दिवशी शांतता भंग करण्याचा उद्देश ?

Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version