spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PM Modi यांच्या हस्ते रंगणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ कार्यक्रम

मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कौशल्य विकास विभागामार्फत राज्यातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये ‘संविधान मंदिर लोकार्पण ‘ हा कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती दिली.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीतंर्गत “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात १५ ते ४५ वयोगटातील दरवर्षी साधारण १ लाख ५० हजार युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण संपूर्णपणे मोफत असून या योजनेसाठीचा सर्व खर्च कौशल्य विकास विभाग करणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला स्टार्टअप्सना निधी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेत राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे, देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हा योजनेचा उद्देश आहे.या योजनेसाठी १०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून, सुमारे एक हजार स्टार्टअप्सना २५ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना शुभारंभ कार्यक्रम

राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना शुभारंभ कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते वर्धा येथे २० सप्टेंबर रोजी होणार आहे.या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय उद्योगमंत्री जीतन राम मांझी,केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,वने मंत्री सुधीर मुनगंटीवार,उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित राहणार आहेत.

हे ही वाचा:

दुधापासून बनवा ‘हा’ पारंपारिक गोड पदार्थ…

9 वर्षानंतर प्रथमच ST नफ्याच्या महामार्गावर, व्यवस्थापकीय संचालकांकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss