मुंबईमधील पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ

मुंबईमध्ये पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये काल मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.

मुंबईमधील पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ

मुंबईमध्ये पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये काल मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तर राज्यांमध्ये अनेक जिल्यामध्ये पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. काल झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २४ तासांमध्ये १.६८ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये काल ७.२६ टक्के पाणीसाठा होता. तर २४ तासात झालेल्या मुसळधार पावसानंतर हाच पाणीसाठा आता ८.९४ टक्के झाला आहे.

मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा करणारे एकूण सात धरणे आणि भातसा धरणातील शिल्लक पाणीसाठा मिळून मागील मिळवून २४ तासांमध्ये १२.५७ टक्के इतका होता. त्यामध्ये आता वाढ झाली आहे. पाणीसाठा १४.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यामध्ये सकाळपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी तुंबले होते. काही भागांतील रस्तेही जलमय झाले. तर नाले, गटारेही तुंबली. मुंबईतील शहरी भागांपेक्षा उपनगरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. मुंबईत सहा ठिकाणी घरांचा काही भाग पडण्याच्या घटना घडल्या.

या धरणांमध्ये मागील २४ तास किती टक्के पाणीसाठा वाढला?

अप्पर वैतरणा – ०० टक्के
मोडक सागर – ३.१ टक्के
तानसा – ३.११ टक्के
मध्य वैतरणा – २.६५ टक्के
भातसा – १.०२ टक्के
विहार – ४.६१ टक्के
तुळसी – ७.१८ टक्के
तुळसी आणि विहार धरणामध्ये मागील २४ तासात सर्वात जास्त पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

हे ही वाचा:

तुम्ही नवजात बाळाच्या आई आहात? तर पावसाळ्यात तुमच्या लहानग्यांची घ्या काळजी…

Smriti Irani यांचा Rahul Gandhi यांच्यावर मोठा आरोप, म्हणाल्या…

मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत तर एकाचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version