भारतीय नौदलात INS Mormugao दाखल

आयएनएस मोरमुगाओ (INS Mormugao) ही १५ बी प्रोजेक्टची दुसरी युद्धनौका भारतीय नौदलात (Indian Navy) दाखल झाली आहे.

भारतीय नौदलात INS Mormugao दाखल

INS Mormugao : आयएनएस मोरमुगाओ (INS Mormugao) ही १५ बी प्रोजेक्टची दुसरी युद्धनौका भारतीय नौदलात (Indian Navy) दाखल झाली आहे. आज या युद्धनौकेच कमिशनिंग (INS Mormugao Commission) झालं आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या उपस्थितीत आयएनएस मोरमुगाओ (INS Mormugao) ही भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे.

आयएनएस मोरमुगाओ ही आयएनएस विशाखापट्टणम सारखीच ब्राह्मोस, बराक क्षेपणास्त्र (मिसाईल), दोन प्रकारच्या तोफा, अत्याधुनिक एमएफस्टार रडार, हायटेक इलेक्ट्रिकल वॉरफेअर सिस्टिम (युद्धप्रणाली), स्वदेशी रॉकेट लाँचर, सागरी देखरेख रडारने सुसज्ज आहे. त्याशिवाय, आकाशात मारा करणारे मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रांचा मारा या युद्धनौकेवरून करता येऊ शकतो. त्याशिवाय, हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणादेखील आहे. या नौकेतील ७६ टक्के यंत्रणा भारतीय बनावटीची आहे. ‘शौर्य, पराक्रम व विजयी भव’ ही आयएनएस मोरमुगाओची युद्धघोषणा आहे. ‘डी ६७’ हा या नौकेचा क्रमांक आहे. ‘प्रोत्साहित आणि मोहिम सज्ज’ असे आयएनएस मोरमुगाओचे ब्रीदवाक्य आहे.

मोरमुगाओ नावाचे शहर गोव्यात समुद्रकिनारी आहे. या शहराला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. पण शहराचे मूळ नाव मोरमुगाओ आहे. मोरमुगाओ हे गोवा मुक्ती संघर्षाचे महत्त्वाचे केंद्र होते. याच कारणामुळे नव्या विनाशिकेला मोरमुगाओ हे नाव देऊन नौदलाच्या माध्यमातूम गोव्यात लोकशाहीसाठी झालेल्या लढ्याला सलामी देण्यात आली आहे.

आयएनएस विशाखापट्टणम नंतर सर्वात अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञान असलेली आयएनएस मोरमुगाओ ही जागतिक स्तरावरील सर्वोत्तम विनाशक युद्धनौका आहे. मुंबईत माझगाव डॉकमध्ये ‘विशाखापट्टणम’ श्रेणीतील ४ नौकांची निर्मिती करण्याची घोषणा २०११ मध्ये करण्यात आली होती. यानंतर माझगाव डॉकमध्ये तयार झालेली ‘कोलकाता’ श्रेणीतील आयएनएस मोरमुगाओ ही दुसरी नौका आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस मोरमुगाओ ही भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. भारतीय नौदलात आयएनएस मोरमुगाओ युद्धनौकेवर भारतीय नौदलाचा झेंडा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते फडकवण्यात आला.

हे ही वाचा : 

दीपक केसरकर साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला अजूनही आदर

उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे ठरल्या ‘मविआ’च्या हल्लाबोल आंदोलनाचा ‘लक्षवेधी’ चेहरा

महाविकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चाला आरंभ Mahavikas Aghadi Mahamorcha

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version