iPhone 16 : भारतात आजपासून ‘iPhone 16’ च्या विक्रीला सुरुवात; भारतीय ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड…

iPhone 16 : भारतात आजपासून ‘iPhone 16’ च्या विक्रीला सुरुवात; भारतीय ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड…

काही दिवसांपूर्वीच जगभर प्रसिद्ध असलेल्या अँपल कंपनीने आयफोन १६ लाँच करण्याबाबत घोषणा केली होती. तसेच १३ सप्टेंबर पासून प्री बुकिंग सुद्धा सुरु केली होती. त्याचमुळे ग्राहकांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र अखेर आजपासून आयफोन १६ च्या विक्रीला सुरुवात झाली आणि ग्राहकांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईतील बीकेसी कॉम्लेक्समधील स्टोरमध्ये आयफोनच्या विक्रीपूर्वीच खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. अँपल स्टोर उघडण्यापूर्वीच रात्रीपासून ग्राहकांची गर्दी जमली होती. राज्याच्या विविध भागातून लोक या अँपल स्टोरला रांग लावण्यासाठी आलेले. तसेच मुंबईसह इतरही भागात अशीच ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

आयफोन १६ ची किंमत काय ?
आयफोन १६ अल्ट्रामॅरिन, टील, गुलाबी, पांढरा आणि काळा (Ultramarine, Teal, Pink, White, Black) या रंगात उपलब्ध असतील. भारतात आयफोन १६ ची किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरु होईल. आयफोन १६ प्लसची किंमत ८९,९०० रुपये, तर आयफोन १६ प्रोची किंमत १,३४,९९० रुपये आणि आयफोन १६ प्रो मॅक्स १,५९,००० रुपये इतकी असेल. अश्या प्रकारची मूळ फोनची किंमत असून स्टोरेजनुसार किंमतीत बदल होईल. या सीरीजमध्ये १२८GB, २५६GB, आणि ५१२GB स्टोरेजचा पर्याय उपलब्ध असेल.

आयफोनकडून ग्राहकांना दिलासा
गेल्यावेळी आयफोन कंपनीने मुंबई आणि दिल्ली येथे दोन स्टोर सुरु केले. आयफोन भारतातच तयार होत असल्यामुळे कमी किंमतीत लाँच होईल असे ग्राहकांना वाटत होते. परंतु कंपनीने ग्राहकांना नाराज केले होते. मात्र यावेळी आयफोनने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आयफोन कंपनीने पहिल्यांदाच जुन्या सीरीजपेक्षा नवी सीरीज स्वस्तात लाँच केली आहे. असे कंपनीने पहिल्यांदाच केले आहे म्हणून सर्व ग्राहक आश्चर्यचकित झाले आहे. आयफोन १६ ची किंमत अधिक असेल असं ग्राहकांना वाटले होते परंतु कंपनीने यावेळी असे केले नाही.

हे ही वाचा:

PM Modi महाराष्ट्राला देणार भेट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

चैत्यभूमीवर जाऊन महामानव आंबेडकरांच्या स्मृतिस्थळासमोर नाक घासा, एवढे तरी करा..Naresh Mhaske यांचं Rahul Gandhi यांना पत्र

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version