जुळ्या मुलांसह Isha Ambani मुंबईत दाखल, कुटुंबीयांनी केले जंगी स्वागत

१९ नोव्हेंबर २०२२ रोजी ईशा अंबानीने लॉस एंजेलिस येथील सेडार्स सेनाई येथे दोन सुंदर मुलांना जन्म दिला

जुळ्या मुलांसह Isha Ambani मुंबईत दाखल, कुटुंबीयांनी केले जंगी स्वागत

देशातील श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर असलेले आणि भारतीय उद्योगक्षेत्रात मोलाचे योगदान देणारे मुकेश अंबानी(Mukesh Ambani) सध्या खूप आनंदी आहेत आणि त्यांच्या या आनंदाचे कारण म्हणजे त्यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani). अंबानींची मुलगी ईशा अंबानीच्या घरी आनंदाने दार ठोठावले आहे. ईशा अंबानी आणि त्यांचे पती आनंद पिरामल (Anand Piramal) आज पहिल्यांदाच त्यांच्या जुळ्या (Twin) मुलांना घेऊन अमेरिकेतून भारतात आले आहेत. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

ईशा अंबानीने (Isha Ambani) १२ डिसेंबर २०१८ रोजी आनंद पिरामल (Anand Piramal) यांच्याशी लग्न केले आणि १९ नोव्हेंबर २०२२ रोजी ईशा अंबानीने लॉस एंजेलिस येथील सेडार्स सेनाई येथे दोन सुंदर मुलांना जन्म दिला, एक मुलगा आणि एक मुलगी. ईशाच्या मुलांची नावे कृष्णा (Krishna) आणि आडिया (Adia) आहेत. त्याचवेळी ईशा अंबानीला रिसीव्ह करण्यासाठी तिची आई नीता अंबानी (Neeta Ambani) , तिचा भाऊ आकाश अंबानी (Akash Ambani) आणि अनंत अंबानी (Anant Ambani) देखील अंबानी कुटुंबातील अनेक सदस्यांसह पोहोचले.

देशातील मोठ्या मंदिरांचे पुजारी देणार आशीर्वाद

देशभरातील विविध मंदिरातील पुजारी त्यांच्या नवजात बाळाला आशीर्वाद देण्यासाठी ईशा अंबानी (Isha Ambani) आणि करुणा सिंधू (Karuna Sindhu) यांच्या घरी भेट देणार आहेत. येथे अंबानी आणि पिरामल या दोन्ही कुटुंबांनी मुलांच्या स्वागतासाठी काही धार्मिक विधीही आयोजित केले आहेत. या शुभ मुहूर्तावर अंबानींचे कुटुंबीय ३०० किलो सोने (300 kg Gold)दान करणार आहेत.

या खास क्षणाची रंगत वाढवण्याचे काम येथील शेफही करणार आहेत. यासाठी जगभरातील नामवंत शेफ मुंबईत पोहोचले आहेत. याशिवाय बालाजी मंदिर तिरुमला तिरुपती (Balaji Temple), नाथद्वाराचे श्रीनाथजी मंदिर (Shreenathji Temple), श्री द्वारकाधीश मंदिरासह (Dwarkadhish Temple) इतर मंदिरांचा प्रसाद सर्वांना वाटण्यात येणार आहे.

मुकेश अंबानींच्या खास मित्राचं पाठवलं विमान …

ईशा आणि तिची मुले कतारहून (Quatar) एका खास विमानाने पोहोचली. हे विमान कतारच्या अमीराने पाठवले होते. तो मुकेश अंबानींचा खास मित्र असल्याचंही म्हटलं जातं. या प्रवासात ईशासोबत मुंबईचे प्रशिक्षित डॉक्टर होते.

हे ही वाचा:

‘या’ देशातून भारतात येताय, तर आता तुमची होणार विमानतळावर कसून तपासणी

सबरीमाला मंदिरातून परतणाऱ्या भाविकांची गाडी ४० फूट खोल दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version