Saturday, July 6, 2024

Latest Posts

तुम्ही देशात पुन्हा जातीवाद रुजवताय, Kishori Pednekar यांची विरोधकांवर टीका

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत, "मराठी मत आम्हाला मिळाले नाही तर कोणाला मिळाले?" असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे.

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) देशभरातून एनडीए आघाडीला (NDA Alliance) बहुमत मिळाले असले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) चांगले यश मिळवले. मुंबईतील एकूण सहा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघावर महाविकास आघाडीने विजय मिळवला. परंतु, त्यानंतर महायुतीकडून (Mahayuti) तसेच मनसेकडून (MNS) शिवसेना उबाठा पक्षावर (Shivsena UBT) मराठी मते न मिळाल्याचे आरोप सातत्याने करण्यात आले. यावर, शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत, “मराठी मत आम्हाला मिळाले नाही तर कोणाला मिळाले?” असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी “देशामध्ये पुन्हा एकदा तुम्ही जातीवाद धर्मवाद रुजवण्याचा प्रयत्न करताय,” अशी टीका विरोधकांवर केली.

किशोरी पेडणेकर यांनी आज (शुक्रवार, १४ जून) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, “मराठी मत आम्हाला मिळाले नाही तर कोणाला मिळाले? पुन्हा एकदा तुम्ही जातीवाद धर्मवाद रुजवण्याचा प्रयत्न करताय. जो मुस्लिम माझ्या महाराष्ट्राचा आणि देशाचा असतो त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. आमच्याकडे मिक्स वातावरण आहे, मराठी मतांना तुम्ही हिणवत आहात का? त्यांचा अपमान करतात का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पुढे त्या म्हणाल्या, “चाळीस टक्के हिरवा, चाळीस टक्के निळा, चाळीस टक्के भगवा असे झेंडे घेऊन कोण निघाले होते ? उद्धव ठाकरे यांनी ज्या सभा घेतल्या त्या यशस्वी झाल्या. तुमचा काँग्रेसवर राग आहे, तर काँग्रेसच्या नेत्याला तुम्ही आल्यानंतर राज्यसभा कशी देता? वरळी मध्ये चे मतदान कमी झाले त्यावर आम्ही अभ्यास करतोय. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा मुसंडी मारू. आम्हाला आमचे पाय कुठे ठेवायचे हे माहिती आहे,” असे त्या यावेळी म्हणाल्या.

लोकसभा निवडणुकीत मुंबईमध्ये शिवसेनेला मुस्लिम मते जास्त मिळाली असल्याचे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. तसेच मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनीसुद्धा शिवसेनेला भगवी मते नाहीतर, हिरवी मते मिळाली असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss