Lalbaug Bus Accident: अपघातामुळे लग्नाचे स्वप्न भंगले, होणाऱ्या नवऱ्यासमोर मृत्यूने कवटाळले; Nupur Maniyar चा दुर्दैवी अंत

Lalbaug Bus Accident: अपघातामुळे लग्नाचे स्वप्न भंगले, होणाऱ्या नवऱ्यासमोर मृत्यूने कवटाळले; Nupur Maniyar चा दुर्दैवी अंत

लालबाग (Lalbaug) येथील गरम खाडा मैदानासमोरील प्रवेशद्वारा जवळ रविवारी बस गर्दीमध्ये घुसून झालेल्या अपघातामध्ये नुपूर मणियार या तरुणीचा मृत्यू झाला. प्राप्तिकर विभागात कारकून असलेली नुपूर गणेश उत्सव कालावधीत लालबागमध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत असायची. लालबागचा राजा (Lalbaug cha Raja) येथून स्वयंसेवकाचा बॅज  घेऊन परतत असताना तिचा अपघात झाला. या अपघातासाठी जबाबदार असलेला दत्ता शिंदे (Datta Shinde) याला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. ऑक्टोबर (October) महिन्यात लग्न करण्याचा नुपूर तिच्या होणाऱ्या पतीचा विचार होता. त्याच्यासोबत बाईकवर मागे बसून ती घरी जायला निघाली होती. परंतु, त्याआधी काळाने तिच्यावर घाला घातला. पोटात अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे प्रयत्न करुनही तिचे प्राण वाचवता आले नसल्याची खंत केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) डॉक्टरांनी व्यक्त केली.

गणेशोत्सव (Ganeshotsav) तोंडावर आला असताना आणि रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे लालबाग (Lalbaug) परिसरात नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. अश्यातच बेस्टची ६६ क्रमांकाची बस दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर येथून सायनमधील राणी लक्ष्मीबाई चौक येथे जात होती. यावेळी बसमधील एका मद्यधुंद प्रवाशाने ड्रायवरसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. शेवटी हा वाद विकोपाला गेल्याने मद्यधुंद प्रवाशाने बस लालबाग परिसरातून जात असताना ड्रायव्हरसोबत झटपट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने स्टिअरिंग हिसकावल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस फुटपाथच्या दिशेने गेली. त्यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनांना बसची धडक बसली.

नेमकं काय घडलं होतं?

ऐन रविवार आणि त्यातच गणेशोत्सव तोंडावर असल्याने लालबाग (Lalbaug) परिसरात मोठी गर्दी होती. बेस्ट प्रशासनाची ६६ क्रमांकाची बस बॅलार्ड पियरवरून सायनमधील राणी लक्ष्मीबाई चौक येथे जात होती. बसमधून दत्ता शिंदे नामक मद्यधुंद प्रवासी प्रवास करत होता. बस लालबागजवळील गणेश टॉकीज परिसरात आली असता त्याचे बसमधील वाहकासोबत वाद झाले. या वादाचे पर्यवसान झटापटीत झाले. मद्यधुंद प्रवाश्याने चालकाजवळ जात बसचे स्टिअरिंग फिरवायला लागला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस वेडीवाकडी धावत फुटपाथवर चढली. यात पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली आणि ९ जण जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यातील गंभीर जखमी असणाऱ्या नुपूरचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: बदलाचे साक्षीदार नव्हे, शिल्पकार व्हा! लाडक्या बहिणींना मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज Teachers Day 2024: भारतात ५ सप्टेंबरलाच ‘शिक्षक दिन’ का साजरा केला जातो? जाणून घ्या सविस्तर…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version