लोअर परळ उड्डाणपुल १८ सप्टेंबर पासून पुन्हा होणार चालू

गेल्याकाही वर्षांपासून रखडलेला लोअर परळ ब्रीज (Lower Parel Bridge) लवकरच वाहतुकीसाठी चालू होणार आहे.

लोअर परळ उड्डाणपुल १८ सप्टेंबर पासून पुन्हा होणार चालू

गेल्याकाही वर्षांपासून रखडलेला लोअर परळ ब्रीज (Lower Parel Bridge) लवकरच वाहतुकीसाठी चालू होणार आहे. १८ सप्टेंबर पासून या पुलाच्या दुसऱ्या बाजूची एक मार्गिका चालू करण्यात येणार आहे. लोअर परळहून (Lower Parel) प्रभादेवीकडे (Prabhadevi) जाणारा पूल ३ जून रोजी सुरु करण्यात आला होता. तर लोअर परळहून करी रोडकडे जाणारी एक मार्गिका येत्या सोमवार पासून सुरु होणार आहे. प्रभादेवी, वरळी, करी रोड आणि लोअर परळच्या रहिवाशांसाठी, आणि नोकरदार वर्गासाठी हा पूल खूप महत्वाचा आहे. हा पूल गणेशोउत्सवाच्या आधल्या दिवशी सुरु करण्यात येणार आहे. मागील पाच वर्षपासून रखडलेला लोअर परेलचा हा पूल अखेर चालू होणार आहे. डिलाई रोड, वरळी, लोअर परेल, दादर येथी नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

पुढच्या आठवड्यापासून गणेशोउत्सवाला सुरुवात होणार आहे. या कालावधीत मोठया प्रमाणावर वाहतूक कोडी होत असल्यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आता मात्र डिलाय रोडवरून वरळीला, दादरला जाणारी मार्गिका सुरू होणार असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात वाहतूक कोंडी कमी झाल्याचं पाहायला मिळू शकतं. मागच्या पाच वर्षपासून येथील नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. २०१८ साली आयआयटी मुंबईने हा पूल धोकादायक असल्याचे घोषित केले. त्यानंतर तो तात्काळ पाडण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर दोन वर्ष कोरोना काळात हा पूल रखडून राहिला. रेल्वेच्या काही परवानग्यांमुळे त्यामध्ये आणखी वर्ष निघून गेली. आता मुंबई महानगरपालिकेनं या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, यासाठी प्रयत्न केलं आणि आता सोमवारपासून या पुलावरील आणखी एक मार्गिका सुरू होताना पाहायला मिळेल. हा पूल बंद केल्यानांतर नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यानंतर महापालिका, रेल्वे, आयआयटी आणि स्थानिक प्रतिनिधींनी पुन्हा या ब्रिजची पाहणी केली. त्यानंतर हा ब्रीज पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

लोअर परळचा पूल म्हणजे, लालबाग, परळ, वरळी, प्रभादेवी यांना जोडणारा दुवा आहे. गणेशोत्सवात लालबाग, परळमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या काळात हा पूल अत्यंत महत्वाचा असतो. गेल्या पाच वर्षपासून पुलाचे बांधकाम चालू असल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला होता. गणेशोत्सवात हा पूल सुरू होणार असल्यामुळे लालबाग-परळकरांना खरंच वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा: 

राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई विमानतळावर मोठा अपघात, विमान क्रॅश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version