Mahaparinirvan Din : ६६ व्या महानिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर दाखल

Mahaparinirvan Din : ६६ व्या महानिर्वाण दिनानिमित्त  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर दाखल

६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सकाळी चैत्यभूमीवर (Chaitya Bhoomi) जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली. तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) देखील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी हजार आहेत.

आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महानिर्वाण दिन आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी संपूर्ण देशभरातून अनुयायांचे चैत्यभूमीवर आगमन झाले आहे. मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी ही भीम सैनिकांनी पूर्णतः भरलेली आहे तर राज्यभरातील भीम सैनिक गेल्या दोन दिवसांपासून चैत्यभूमीवर उपस्थित होत आहेत. तसेच आज सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीवर हजेरी लावून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडक यांना आदरांजली वाहिली आहे. त्याच बरोबर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देखील या वेळेस मुख्यमंत्र्यांबरोबर हजर होतेत. तसेच राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे चैत्यभूमीवर उपस्थित असलेल्या आणि राज्यभरातील भीमसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. महामानवाने अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी. इंदूमिलमधील स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होईल. असे मुख्यामंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या आठवणी जपण्याचं काम केलं जाईलआणि इतिहाज जपला जाईल. असे देखील मुख्यमंत्री यांनी भीमसैनिकांना सांगितलं आहे.

हे ही वाचा : 

नाश्त्यासाठी बनवा चीझ-चिली उत्तपा

Jay Jay SwamiSamarth तांत्रिक एकनाथने उगारली स्वामींवर कुर्हाड, पहा नेमकं काय होणार ‘दत्त जयंती विशेष भागात’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला मोठा दावा, चंद्रपुरात सोन्याचे साठे

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version