Mahaparinirvan Din : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीम सैनिकांना चैत्य भूमीवर जाऊन केलं मार्गदर्शन

Mahaparinirvan Din : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीम सैनिकांना चैत्य भूमीवर जाऊन  केलं मार्गदर्शन

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाणदिन (Mahaparinirvan Din) आहे. त्यानिमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईतील चैत्यभूमीवरील (Chaitya Bhoomi) कार्यक्रमात उपस्थिती दाखवत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन केले आणि भीमसैनिकांना मार्गदर्शन केलं आहे. भीम सैनिकांचे मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की “चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झालेलं आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

आज ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांच्या बरोबर शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीवरील कार्यक्रमात उपस्थिती दाखवत महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन केले आणि भीमसैनिकांना मार्गदर्शन केलं आहे. त्यावेळी उपमुख्यमंतत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची दशा आणि दिशा बदलण्याचं काम केलं. व्यक्तीला समान अधिकार असेल, कोणामध्येही भेद करता येणार नाही, असं संविधान त्यांनी आपल्याला दिलं. जगातील सर्वोत्तम संविधान हे आपल्याकडे आहे. हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच शक्य झाले आहे,” अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितलं की “आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा आहे. या देशाची दशा आणि दिशा बदलण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. व्यक्तीला सामान अधिकार असेल, कोणामध्येही भेद करता येणार नाही असं संविधान त्यांनी दिलं. आज आपला देश प्रगती करत आहे कारण लोकशाही जिवंत आहे. सर्वाना एक मार्ग एक संधी संविधानाने उपलब्ध करुन दिली. त्यांचे आभार मानण्याकरता आपण सगळे जमले आहोत. त्यांचा संदेश जगाच्या कल्याणाचा आहे.तर पंतप्रधाना सुद्धा सांगतात की एक सर्वसामान्य चहावाला हा देशाचा पंतप्रधान होऊ शकला याचे कारण बाबासाहेबच आहेत.” असे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

या दरम्यान उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, “इंदू मिलमधील स्मारकारचं काम वेगाने सुरु आहे. राज्य सरकारच्या वतीने त्यांनी आश्वासन दिले की स्मारकाचा कार्यक्रम लवकरच होईल.” असे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा : 

नाश्त्यासाठी बनवा चीझ-चिली उत्तपा

Jay Jay SwamiSamarth तांत्रिक एकनाथने उगारली स्वामींवर कुर्हाड, पहा नेमकं काय होणार ‘दत्त जयंती विशेष भागात’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला मोठा दावा, चंद्रपुरात सोन्याचे साठे

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version