सततच्या पावसामुळे सामान्यांना फटका, भाज्यांचे दर भिडले गगनाला…

रखरखत ऊन आणि आता मुसळधार पाऊस यामुळे भाज्यांच्या उत्पादनात ७० टक्क्यांनी घट झाली आहे. टोमॅटो, कारलं, भेंडी, भोपळा यासह अनेक भाज्या महागल्या आहेत.

सततच्या पावसामुळे सामान्यांना फटका, भाज्यांचे दर भिडले गगनाला…

देशाच्या अनेक भागात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे सर्व सामान्यांचे प्रचंड हाल होत आहे. यातच आता पावसाचा परिणाम सामन्यांच्या खिशावरही होणार आहे. सध्या पावसाचा दर वाढल्याने भाज्यांचे दर हे प्रचंड वाढले आहेत. आधी उन्हामुळे शेतकऱ्यांची पिकं करपली होती, त्यानंतर अवकाळीनं गोंधळ घातला. आता तर, पावसामुळे पिकांची नासाडी होताना दिसत आहे. परिणामी भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.सध्या भाज्यांचे दर हे ५० रुपये किलोच्या पुढे आहेत. तर टोमॅटो विक्रमी दराने विकला जात आहे

सध्या बाजारात कोणतीही भाजी ५० रुपये किलोच्या खाली मिळत नाही आहे. तर टोमॅटोचे दर हे १०० रुपये किलोच्या पुढे आहेत. महाराष्ट्रातील भंडाऱ्यात टोमॅटो १४० रुपये किलोनं विकले जात आहेत. तसेच आल्याच्या किमतीतही प्रचंड वाढ झाली आहे. आलं विक्रमी किमतीला विकलं जात आहे. पाव किलो आलं ८० ते १०० रुपयांना विकलं जात आहे. यापूर्वी रखरखत ऊन आणि आता मुसळधार पाऊस यामुळे भाज्यांच्या उत्पादनात ७० टक्क्यांनी घट झाली आहे. टोमॅटो, कारलं, भेंडी, भोपळा यासह अनेक भाज्या महागल्या आहेत.

आजच्या घडीला भाजीपाला या किमतीला मिळत आहे –

टोमॅटो – १०० रु./किलो
आले – ३२० रुपये/किलो
घोसळी – ५० रुपये/किलो
भिंडी – ६० रुपये/किलो
कारला – ६० रुपये/किलो
भोपळा – ५० रुपये/किलो
फ्लॉवर – ६० रुपये/किलो
पडवळ – ६० रुपये/किलो
सोयाबीन – १२० रुपये/किलो

हे ही वाचा:

Guru Purnima 2023, गुरू पौर्णिमेला तुमच्या गुरूंना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

“Satyaprem Ki Katha” हा चित्रपट बॉक्सऑफिस वर ठरला हिट, विकेंडला केली तब्ब्ल इतकी कमाई…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version