spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मीरा भाईंदरमध्ये नाले-गटारे तुंबली

काही दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला होता. मिरा भाईंदर महानगरपालिकेने नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला होता.

काही दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला होता. मिरा भाईंदर महानगरपालिकेने नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला होता. मिरा भाईंदर शहराला पूर्व पश्चिम जोडणारा नाला तुंबल्याचे दृश्य दिसत आहे. त्यामुळे आता मीरा भाईंदर येथे राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी नालेसफाई व्यवस्थित झाली नाही असे आरोप करण्यात आले आहेत. मिरा रोडच्या नया नगर येथील बॅक रोड जवळ रेल्वे लाईनच्या समांतर एक प्रमुख नाला गेला आहे. त्या नाल्यावर सुशोभिकरणाच्या नावाखाली पालिकेने सेल्फीपॉईंट बनवलं आहे. असे अनेकांनी आरोप लावले आहेत.

या वर्षांमध्ये नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे मीरा भाईंदरमध्ये पावसाने पाणी साचण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली होती. सेल्फी पॉंईट बांधल्यानंतर अनेकांनी विरोध देखील केला होता परंतु आता हा सेल्फी पॉईंट चरीस गर्दुल्यांचा अड्डा बनत चालला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मागील पंधरा दिवसापासून हा सेल्फी पॉईट बंद आहे. नाला साफ करण्याच्या नावाखाली सेल्फी पॉंईट बंद करुन नाल्यावरील झाकणे काढली आहेत.

स्थानिक नागरिकांकडून अनेक आरोप करण्यात आले आहे. भिवंडीच्या निजामपूर शहर महानगर पालिकेच्या अंतर्गत नाले आणि गटार सफाईसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतात. परंतु तरीही दरवर्षी भिवंडीमध्ये जलमय परिस्थिती पाहायला मिळते आणि सर्व परिस्थितीला जबाबदार नाला आणि गटरसफाईत होणारे भ्रष्टाचार असल्याचा आरोप समाजसेवक परशुराम पाल यांनी केला आहे. या बाबतीत त्यांनी महानगर पालिकेला अर्ज देखील दिला आहे. परंतु त्यांची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे समाजसेवक परशुराम पाल यांनी प्रत्यक्षात भ्रष्टाचार कशाप्रकारे होत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

NEET UG Result 2023: नीट परीक्षेत मुंबईच्या विद्यार्थ्याने मारली बाजी; राज्यातून पहिला

Sushant Singh Rajput ला जाऊन आज तीन वर्ष पूर्ण, कुटुंबीय आज ही शोकात…

आषाढीसाठी विठुरायाच्या दगडी मुर्त्या बाजारात सज्ज; लाखो रुपयांची उलाढाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss