रविवार, ११ जून २०२३ रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर Mega Block!

मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवार दिनांक ११ जून रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे ११ जून रोजी रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

रविवार, ११ जून २०२३ रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर Mega Block!

मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवार दिनांक ११ जून रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे ११ जून रोजी रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी १०.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तसेच मध्य रेल्वे प्रमाणे हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पासून सकाळी १०.४८ ते दुपारी ०३.४९ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन स्लो सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवल्या जातील, भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे डाऊन स्लो लाईनवर वळवल्या जातील.सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत घाटकोपरहून सुटणाऱ्या अप स्लो सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.

मध्य रेल्वेवर तसेच पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक असला तरी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण ब्लॉक दरम्यान CSMT-वाशी सेक्शनवर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. या शिवाय ट्रान्सहार्बर आणि उरण मार्गावर कोणताही ब्लॉक जाहीर करण्यात आला नसला तरी गोरेगाव ते जोगेश्वरी स्थानकांपर्यंत पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन धिम्या मार्गावर १४ तासांचा पॉवर ब्लॉक असणार आहे. हा पॉवर ब्लॉक १२.०० ते १४ तास असणार आहे.

११ जून रोजी असणाऱ्या या ब्लॉकची माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने शुक्रवारी जाहीर केली आहे. या ब्लॉक दरम्यान रेल्वेचे अनेक अभियांत्रिकी तसेच देखभालीची कामे करण्यात येणार आहेत. म्हणून रेल्वेच्या उपनगरीय विभागांवर ब्लॉक लावण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ-खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील. तसेच ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी भागावर विशेष लोकल धावतील आणि ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

हे ही वाचा:

City of Dreams साठी प्रिया बापटने केला मोठा त्याग! खुद्द अभिनेत्रीने केली खंत व्यक्त

केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांची आज नांदेडमध्ये जाहीर सभा

खरंच केली का ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी Ball tempering? पाकिस्तानचा माजी खेळाडू Basit Ali चे आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version