spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मध्य रेल्वेच्या मार्गांवर आज मेगाब्लॉक, परंतु हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक सुरळीत

आज मध्य रेल्वेच्या मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने दिली आहे. परंतु हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक आज सुरळीत राहणार आहे.

आज मध्य रेल्वेच्या मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने दिली आहे. परंतु हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक आज सुरळीत राहणार आहे. कारण ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) प्रदान करण्यात येणार आहे. खारघरमध्ये आज हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आज हार्बर रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. आज मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीनं देण्यात आली आहे.

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या आयोजनामुळे हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील हार्बर रेल्वेचा मेगा ब्लॉक देखील रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती. याबाबतीत त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister Raosaheb Danve) यांना पत्र लिहले होते. अप्पासाहेब धर्माधिकारी याना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार प्रदान समारंभास येणाऱ्या अनुयायींच्या सोयीसाठी रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्यात करावा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.

रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगा ब्लॉक आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत असल्याचं सांगत प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनने दिलगीर व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : 

नवनीत राणांच्या टीकेवर मनीषा कायंदे यांचे प्रत्युत्तर…

जागतिक आरोग्य संघटनेचा ७५ वा जागतिक आरोग्य दिन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार,आमदारांचा ९ एप्रिलला अयोध्या दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss