मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी नियोजन करा

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडत असाल आणि लोकल ट्रेनने (Local train) प्रवास करत असला तर घराबाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक नक्की तपासा आणि नियोजन करूनच घराबाहेर पडा.

मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी नियोजन करा

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडत असाल आणि लोकल ट्रेनने (Local train) प्रवास करत असला तर घराबाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक नक्की तपासा आणि नियोजन करूनच घराबाहेर पडा. आज रविवारी १२ मार्च रोजी मध्य रेल्वेकडून देखभालीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर असणार आहे. परंतु या मार्गावर सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत रेल्वेची सेवा धीम्या गतीने असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांपासून डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यांनतर गाड्या नियोजित स्थानकावर थांबतील. ठाण्याच्या पुढील मार्गावर असलेल्या जलद गतीच्या गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. परंतु नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चुनाभट्टी वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११. १० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी, बेलापूर, पनवेल करता सुटणारी आणि वांद्रे गोरेगाव येथील सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून डाउन हार्बर मार्गावर सुटणारी सेवा सुरू असणार आहे. मेगा ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला यादरम्यान विशेष सेवा सुरू असणार आहे परंतु २० मिनिटात कालांतराने या सेवा सुरु असणार आहेत. मेगाब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवासाना परवानगी आहे.

हे ही वाचा :

ईडीच्या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांना भावना झाल्या अनावर

Satish Kaushik यांच्या मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण? पोलिसांना सापडली औषधे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version