मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. डिसेंबर 2023 पर्यंत सीप्झ-कुलाबा यादरम्यान मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.

स्पिझ ते कुलाबा दरम्यान येणाऱ्या २६ पैकी २१ स्टेशन चा काम आता ९०% पूर्ण झाला आहे.

मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. डिसेंबर 2023 पर्यंत सीप्झ-कुलाबा यादरम्यान मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.

स्पिझ ते कुलाबा दरम्यान येणाऱ्या २६ पैकी २१ स्टेशन चा काम आता ९०% पूर्ण झाला आहे.तसेच बांधकामासोबत इतर उपकरणे लावण्याचं काम झोरदार चालू आहे त्यातील १८ स्टेशन वर हे काम ५०% पूर्ण देखील झाला आहे. विधानभवन स्टेशनचे काम 93 टक्के पूर्ण झालंय. तर एमआयडीसी स्टेशनचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे. मार्च 2021 पासून ट्रॅक टाकण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत ट्रॅक टाकण्याचे काम 56 टक्के पूर्ण झाले आहे. 33.5 किमी लांबीच्या मार्गिकावर अप आणि डाऊन मार्ग मिळून 66.07 किमी. ट्रॅक बसवण्यात येणार आहे. या पूर्ण मार्गावर 10745 मॅट्रिक टन ट्र्रॅकचा वापर होणार आहे. एमएमआरसीने आरेतील कारशेड लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवलं आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजेच एमएसआरसीने आरेतील कारशेड लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारशेड निर्मितीचे काम जवळपास 53.8 टक्के पूर्ण झाले आहे.

 

कारशेडमध्ये ट्र्रॅक आणि उपकरणं याचं काम वेगाने सुरु आहे. सीप्झ ते वांद्रे वांद्रे यादरम्यान नऊ स्थानकावरील काम वेगाने सुरु आहे. एप्रिल 2023 पर्यंत ही स्थानके पूर्णपणे तयार होतील. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिकावर आतापर्यंत मेट्रो चाचणी यशस्वी झाली आहे. यादरम्यान 10 किमीपर्यंत मेट्रो धावली असून सर्व सुरक्षा तपासण्यात आली आहे. मेट्रो प्रवासी वाहतुकीसाठी सक्षम आहे का? याबाबत पडताळणी करण्यात आली. त्याशिवाय, मध्यम आणि हाय वोल्टेजवर मेट्रोची चाचणी करण्यात आली. तसेच मेट्रोच्या ब्रेकची क्षमता, एअर कम्प्रेसर, स्वयंचलित दरवाज्यांची कार्यक्षमता, वायुविजन याचीही चाचणी झाली.

हे ही वाचा : 

Amruta Fadnavis आणि Priyanka Chaturvedi यांच्यात ट्विटर वॉर

शेतकरी जगला तरच राज्य जगेल, राज्यातला शेतकरी हवालदिल, अजित पवार

ठाण्यातील घोडबंदर रोडचे नाव बदलून ‘वीर चिमाजी आप्पा मार्ग’ करा, शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांची आयुक्तांकडे मागणी

 

 

Exit mobile version