Mhada : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याकरिता उरले आता काहीच तास बाकी; मुदत संपण्यापूर्वी करावा लागेल अर्ज…

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याकरिता उरले आता काहीच तास बाकी; मुदत संपण्यापूर्वी करावा लागेल अर्ज…

Mhada : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांची सोडत ८ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. या घरांसाठी अर्ज करण्यासाठी म्हाडाकडून मुदतवाढ मिळाली होती. म्हाडाकडून मुदतवाढ मिळाल्यामुळे ज्या नागरिकांना दिलेल्या मुदतीत कागदपत्र जमा करणं अवघड पडलं होते त्यांना दिलासा मिळाला आणि फायदेशीर सुद्धा झालं. म्हाडानं सुरुवातीला ९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर अशी मुदत दिली होती परंतु या तारखेत वाढ करण्यात आली होती. ही मुदतवाढ संपायला आता एका दिवसाचा अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र, म्हाडातर्फे अर्ज नोंदणी करणे आणि अनामत रक्कम जमा करणे यासाठी १९ सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे. मुंबईकरांना म्हाडाच्या या लॉटरीत सहभागी व्हायचं असल्यास वाढलेल्या मुदतीनुसार उद्या सकाळी ११.५९ वाजण्यापूर्वी अर्जांची नोंदणी करणं गरजेचं आहे. बारा वाजल्यानंतर अर्ज दाखल करता येणार नाही.

अर्ज दाखल झाल्यानंतर २७ सप्टेंबर पर्यंत म्हाडाकडून कागपत्र पडताळणीची प्रक्रिया होईल. त्यानंतर २७ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता अर्जदारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात येईल. २९ सप्टेंबर दुपारी ज्यांना यादीत आक्षेप असतील त्यांना ते नोंदवावे लागणार आहेत. त्यानुसार ३ ऑक्टोबरला म्हाडा अंतिम यादी जाहीर करेल. तर, ८ ऑक्टोबरला सोडत काढली जाईल त्याद्वारे कुणा कुणाला घरं मिळालं हे जाहीर केलं जाईल.

कोणत्या भागात म्हाडाची घरे ?
२०३० सदनिकांच्या विक्रीकरिता विविध उत्पन्न गटातील लोकांना म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध ठिकाणी घरे मिळणार आहेत. म्हाडाकडे जवळजवळ ६६ हजार अर्जदारांनी अर्ज केले आहेत. तर अर्जांच्या नोंदणीची संख्या ८९ हजारांवर पोहचली आहे.

Devendra Fadnavis यांनी कितीही गणितं करू द्या, सगळी गणितं मोडून टाकणार; Manoj Jarange Patil यांचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version