Mhada Lottery 2023, मुंबईकरांसाठी खुशखबर! तब्बल ४७२१ घरांची लॉटरी

मुंबईमध्ये गृहस्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा लॉटरीच्या (MHADA Lottery 2022) प्रतिक्षेत तुम्ही असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

Mhada Lottery 2023, मुंबईकरांसाठी खुशखबर! तब्बल ४७२१ घरांची लॉटरी

Mhada Lottery : मुंबईमध्ये गृहस्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा लॉटरीच्या (MHADA Lottery 2022) प्रतिक्षेत तुम्ही असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आता म्हाडाकडून तब्बल ४७२१ (Mhada Lottery 2023) घरांच्या लॉटरची सोडत ही काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र हाउसिंग एरिया डेवलपमेंट अथॉरिटी (Maharashtra Housing Area Development Authority) म्हणजेच म्हाडाकडून आजवर अनेकांचं हक्काचं घर मिळवण्याचं स्वप्न साकार केलं आहे.

जर तुम्हाला मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न असेल तर तुमची ती उच्च आता लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडाकडून लवकरच ४७२१ घरांसाठी आता सोडत काढण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात ही सोडत जाहीर होईल अशी शक्यता आहे. म्हाडामध्ये ठाणे, विरारमध्ये नव्या घरांची भर पडली आहे. त्यामुळे आता लवकरच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून या सदनिकांसाठी सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या आसपास वसई-विरार, ठाणे आणि नवी मुंबईत परवडणाऱ्या दरात घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळत असल्याने म्हाडा मुंबई आणि कोकण मंडळाच्या सोडतीची इच्छुकांना प्रतीक्षा असते.

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सोडत काढण्याची तयारी सुरु आहे. यामध्य सुमारे ४७२१ घरांसाठी सोडत ही काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये २० टक्क्यांतील आणि पंतप्रधान आवास योजनेमधील सुमारे ५५० नवीन घरे नुकतीच मंडळाला उपलब्ध झाली.त्यामुळे आता ही ५०० घरे म्हाडाच्या योजनेत समाविष्ट करण्यात येत आहेत. आता म्हाडाच्या कोकण विभागात नवीन घरांची भर पडली आहे. ठाणे येथील विहंग समूहाच्या प्रकल्पातील २० टक्के योजनेतील २५६ घरे आणि ठाणे महानगरपालिकेकडून मिळालेल्या पंतप्रधान आवास योजनेतील ३०० घरांची यामध्ये भर पडली आहे. म्हाडाला नवीन घरे उपलब्ध झाली आहेत अंडी ही वाढीव घरे अल्प गटासाठी आहेत. या सर्व घरांचे क्षेत्रफळ अंदाजे ३०० चौरस फुट असून त्यांची किंमती २० लाख रुपयांपर्यंत आहे. ही सर्व घरे अंदाजे ३०० चौरस फुटांची आहेत आणि त्यांची अंदाजे किंमत १७ लाख रुपयांपर्यंत आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीला मोठा धक्का, खासदारच सदस्यत्व रद्द

Nashik Padvidhar Election, सत्यजीत तांबेच्या अडचणी वाढणार ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version