Mhada Lottery 2023, लवकरच मुंबईत होणार हक्काचं घर, तब्बल ८ हजार घरांची सोडत

मुंबईमध्ये गृहस्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा लॉटरीच्या (MHADA Lottery 2022) प्रतिक्षेत तुम्ही असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात स्वतःच घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतंच. एका ठराविक वयात आलो की प्रत्येकाला हे स्वप्न साकार करण्याची इच्छा ही होतच असते.

Mhada Lottery 2023, लवकरच मुंबईत होणार हक्काचं घर, तब्बल ८ हजार घरांची सोडत

MHADA LOTTERY 2023 : मुंबईमध्ये गृहस्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा लॉटरीच्या (MHADA Lottery 2022) प्रतिक्षेत तुम्ही असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात स्वतःच घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतंच. एका ठराविक वयात आलो की प्रत्येकाला हे स्वप्न साकार करण्याची इच्छा ही होतच असते. ही उच्च पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जिवाच्या आकांताने मेहनत करत असतो. अश्या प्रत्येक व्यक्तीसाठी म्हाडाने ऐक मोठा दिलासा दिला आहे. म्हणजेच मुंबईमध्ये घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडा प्राधिकरणाच्या कोकण आणि मुंबई मंडळाने लॉटरी काढली आहे. प्रत्येकी ४ हजार अशी एकूण ८ हजार घरांसाठीची लॉटरी आता मार्च महिन्यात निघणार आहे.

प्रत्येकी ४ हजार अशी एकूण ८ हजार घरांसाठीची लॉटरी आता मार्च महिन्यात निघणार आहे. यामध्ये मुंबई मंडळाच्या सुमारे ४ हजार घरांपैकी २ हजार ६०० घरे गोरेगाव पहाडी परिसरातील आहेत. विशेष म्हणजे येथे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांसाठी घरे बांधली जात आहेत. यातील अत्यल्प उत्पन्न गटातील घराची अंदाजित किंमत ३५ लाख रुपये आहे. गृहनिर्माण बाजारपेठेत मात्र या घरांची किंमत अंदाजे ७० लाखांच्या आसपास असल्याचे समजते. तर गेल्याच महिन्यात म्हाडाच्या पुणे मंडळाच्या घरांची लॉटरी जाहीर केली होती. तर आता म्हाडा कोकण मंडळातर्फे मार्च महिन्यात घरांची लॉटरी काढणार आहे. या लॉटरीसाठीची जाहिरात येत्या काही दिवसांत प्रसिद्ध होणार आहे.

२०२५ साली पण लॉटरी!

२०२५ मध्ये म्हाडाकडून गोरेगाव विभागाच्या पहाडी भागात आणखी एक खास सोडत जरी केली जाणार आहे. यामध्ये मध्यम उत्पन्न आणि उच्च उत्पन्न आर्थिक गटांसाठीही घरे बांधली जात आहेत.तसेच उच्च उत्पन्न गटासाठी १०५ घरे बांधली जात आहेत. ९६० चौरस फुटांची ही घरे आहेत. तर मध्यम उत्पन्न गटासाठी २२७ घरे बांधली जात आहेत. ८०० चौरस फुटांची ही घरे आहेत. ३५ मजली इमारतीचा गृहप्रकल्प हा साकारण्यात येणार आहे. यामध्ये ३५+३ मजले अधिक पोडियम पार्किंगची सोय असणारी इमारत असेल.

Exit mobile version