spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mhada Project : २४ हजाराहून अधिक झोपडीधारकांना मिळणार स्वतःच्या हक्काचे घर; झोपडपट्टी विकासाला मिळणार चालना

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सरकार नवनव्या योजना राबवत आहेत. सरकारकडून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे स्वप्न सरकारकडून पाहण्यात आले आहे. त्यामुळे अनेक एसआरए (SRA) प्रकल्प सुरु असल्याचे दिसून येत आहे. मात्र काही ठिकाणी कामाआड येणाऱ्या अडचणींमुळे पुनर्विकासाची (Redevelopment) कामे रखडली जात आहेत. त्यामुळे अनेक मुंबईतील अनेक झोपडीधारकांचे इमारतीमध्ये स्वत:चे घर असण्याचे स्वप्न अर्धवट राहिली जातात. परंतु आता अशाच झोपडीधारकांसाठी एक आनंदाची बातमी मिळत आहे. मुंबईतील वर्षानुवर्ष रखडलेले एसआरए प्रकल्प आता महाडा पूर्ण करणार आहे. त्यामुळे झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध भागातील म्हाडाच्या जमिनीवरील विकासकांनी अर्धवट सोडलेले १७ प्रकल्प आता म्हाडातर्फे पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या २४ हजाराहून अधिक झोपडीधारकांना स्वत:च्या हक्काचे घर मिळणार आहे. त्याचबरोबर हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर झोपडीधारकांसोबतच म्हाडाला देखील हाउसिंग स्टॉक (Housing Stock) उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ती घरे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

कोण कोणत्या भागात हा प्रकल्प राबवला वाजणार आहे ?

गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, बोरिवली, मजास, दहिसर, चेंबूर, कुर्ला या भागांमध्ये हे प्रकल्प आहेत.

या प्रकल्पासाठीचे नियोजन कसे असेल ?

त्याचबरोबर संबंधित प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडण्यामागची नेमकी कारणे आम्ही आधी समजून घेऊ. तेथील झोपड्यांची संख्या, गार्डन, रस्ता, विविध आरक्षणे आदी बाबींचा अभ्यास करून पुनर्विकासासाठी नेमकी किती जागा उपलब्ध होईल, याचा सर्वप्रथम आढावा घेतला जाईल. तसेच उर्वरित जागेत सर्वसामान्यांसाठी घरे बांधून त्याची लॉटरीद्वारे विक्री करायची की रिकाम्या प्लॉटची थेट विक्री करायची, याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईत म्हाडाच्या जमिनीवरील २९ एसआरए प्रकल्प कित्येक वर्षे रखडली गेली आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडून सरकारकडे दबाव टाकण्यात आला. त्यापैकी रखडलेले १७ एसआरए प्रकल्प पूर्ण करण्याची तयारी आता म्हाडाने तयारी सुरु केली आहे. त्यादृष्टीने अभ्यास देखील सुरु केला आहे.

Latest Posts

Don't Miss