spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आमदार अँड Ashish Shelar यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल लायब्ररीमध्ये नॉलेज सेंटर सुरु

आमदार अँड आशिष शेलार यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. ग्रंथालयाने काळाजी गरज ओळखून सध्याच्या आणि आगामी युवा पिढी साठी डिजिटल नॉलेज सेंटर स्थानिक आमदार व लायब्ररीचे उपाध्यक्ष अँड आशिष शेलार यांच्या सहयोगातून सुरू केले आहे.

विविध स्पर्धा परीक्षां देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वांद्रे पश्चिम (Bandra West) येथील नॅशनल लायब्ररीमध्ये डिजिटल नॉलेज सेंटर (Digital Knowledge Center at National Library) सुरू करण्यात आले असून काल मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. ग्रंथालयाने काळाजी गरज ओळखून सध्याच्या आणि आगामी युवा पिढी साठी डिजिटल नॉलेज सेंटर स्थानिक आमदार व लायब्ररीचे उपाध्यक्ष अँड आशिष शेलार यांच्या सहयोगातून सुरू केले आहे.

या सेंटरला लायब्ररीचे अनेक वर्षे सदस्य असलेले व वाचन चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या दिवंगत बाबाजी (मधुकर) धोंडू शेलार यांचे नाव या सेंटरला देण्यात आले आहे. काल छोटेखानी कार्यक्रमात या सेंटरचे लोकार्पण समारंभ पुर्वक करण्यात आले. यावेळी अॅड आशिष शेलार, अॅड प्रति‍मा शेलार, विनोद शेलार, वैशली शेलार-बाबू यांच्‍यासह अन्‍य शेलार कुटुंब व लायब्ररीचे कार्यवाह प्रमोद महाडीक आणि अन्‍य कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. खास आवर्जून उपस्थित असलेल्‍यांमध्‍ये पंडित उपेंद्र भट यांचाही समावेश होता.

या सेंटरच्या माध्यमातून सुमारे 5000 डिजिटल पुस्तके, मासिके यासह विद्यार्थ्‍यांना स्‍पर्धा परिक्षांसाठी लागणारे वाचन साहित्‍य डिजिटल स्‍वरुपात उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे. नॅशनल लायब्ररी वांद्रे ही संस्था १०० वर्षाहून अधिक काळ समाजातील सर्व स्तरावरील आणि वयोगटातील नागरिकांना उत्तमोत्तम वाचन साहित्य पुरवत आहे. ह्यातील ब-याच काळ ते साहित्य पुस्तके, मासिके आणि इतर मुद्रित स्वरूपात प्रामुख्याने होते. मागील दोन दशकांत मुद्रित साहित्याच्या जोडीला अंकिय साहित्य (डिजिटल स्वरूपात) ह्याची भर पडली आहे. भविष्यात डिजिटल स्वरूपातच माहितीची देवाण-घेवाण होणार असल्याने लायब्ररीनेही या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss