MMR प्रदेश एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठेल, CM Shinde यांची ग्वाही 

MMR प्रदेश एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठेल, CM Shinde यांची ग्वाही 

हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे आयोजित ‘पुढारी न्यूज’ च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ‘महाराष्ट्राचा विकास व भविष्यातील महाराष्ट्राची वाटचाल’ या विषयावर प्रसन्न जोशी यांनी घेतलेल्या मुलाखत प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी संवाद साधला. राज्यातील पायाभूत विकासासाठी आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे प्रकल्प सुरू आहेत. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकार, जागतिक बँक, आशियाई डेव्हलपमेंट बँक आदी मार्फत निधी उभारणी केली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या विकास प्रकल्पांसाठी पाठबळ असून एमएमआर प्रदेश एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी महाराष्ट्राच्या विकासाचा पट उघडून दाखविला. विकास कामांमुळे गुजरात व कर्नाटकपेक्षा महाराष्ट्र देशात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. मेट्रो लाईन – ३ प्रकल्प सप्टेंबर मध्ये जनतेसाठी खुला केला जाईल. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक, रेल्वेचे पायाभूत सुविधा व वाहतूक प्रकल्प, बुलेट ट्रेन, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा – कोस्टल रोड या प्रकल्पांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुंबई महानगर प्रदेश (MMR) एक ट्रिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट गाठू शकतो असे नीती आयोगाने म्हटले आहे. या दृष्टीने लॉजिस्टिक्स पार्क, वाढवण, दिघी, औद्योगीक हाय-ग्रोथ इंडस्ट्रीयल हब, विकास करत आहे. नागरी विकासाच्या व उत्पादन क्षेत्र प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत विकासाला दिलेले प्राधान्य महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्न तसेच युवक, महिला, शेतकरी, विद्यार्थी यांच्या बाबत राज्य सरकारच्या धोरणांच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे. आमच्या श्रद्धेचा व अस्मितेचा विषय आहे. सदर प्रकरणाच्या अनुषंगाने दोन समित्या स्थापन करण्यात येत आहेत. या घटनेची एक समिती चौकशी करेल व दुसरी समिती त्या जागी नवीन पुतळा लवकरात लवकर उभारण्याच्या कार्यवाहीसाठी काम करेल. या कार्यक्रम स्थळी मुख्यमंत्री महोदयांचे आगमन झाल्यानंतर पुढारी मीडिया हाऊस तर्फे पद्मश्री प्रतापराव जाधव यांनी त्यांचे ‘वेध महाराष्ट्राचा’हे कॉफी टेबल बुक व पुढारी न्युज च्या ‘गोल्डन बूम’ चे सन्मानचिन्ह देऊन स्वागत व सत्कार केला. याप्रसंगी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, समूह संपादक योगेश जाधव, माध्यम प्रतिनिधी व यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा:

“आदिवासी भागातील PESA कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक”; Cm Eknath Shinde यांची ग्वाही

छ. शिवाजी महाराज माझं दैवत! त्यांच्या चरणावर शंभर वेळा डोकं ठेवून माफी मागायला तयार: CM Eknath Shinde

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version