मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केला आरोप, महालक्ष्मीची जमीन अंबानी, अदानीच्या घश्यात…

मुंबईची ओळख मानले जाणारे महालक्ष्मी रेसकोर्स (Mahalakshmi Race Course) हलवण्याच्या बाबती आता वेग आल्याच दिसून येत आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केला आरोप, महालक्ष्मीची जमीन अंबानी, अदानीच्या घश्यात…

मुंबईची ओळख मानले जाणारे महालक्ष्मी रेसकोर्स (Mahalakshmi Race Course) हलवण्याच्या बाबती आता वेग आल्याच दिसून येत आहे. महालक्ष्मी रेसकोर्सचा भाडेकरार १० वर्षांपूर्वी संपुष्टात आला असून आता या भूखंडावर थीमपार्क (theme park) उभारण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्स मुंबईतच पण दुसरीकडे हलविण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Maharashtra Navnirman Sena Sandeep Deshpande यांनी देखील या वादात एंट्री केली आहे. महालक्ष्मीची जमीन अंबानी, अदानीच्या घश्यात आघालण्यासाठी सर्व फंडे आहेत असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

दक्षिण मुंबईतल्या महालक्ष्मीऐवजी आता रेसकोर्स मुलुंडमधल्या डम्पिंग ग्राऊंडवर (Dumping ground in Mulund) नेण्याचा प्रस्ताव आहे. मुलुंडचा डम्पिंग ग्राऊंडचा परिसर हा साधारणपणे २४ हेक्टरचा (24 hectares) असल्याचं सांगितलं जात आहे. काही वर्षांपूर्वीच रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचं (Royal Western India Turf Club) लीज संपले आहे. त्यामुळे या जागेचा ताबा पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी मुंबई महानगर पालिकेनी (Mumbai Municipal Corporation) राज्य सरकारला लवकरच पत्र लिहिणार आहे. मात्र रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला बदली जागा देण्यात येणार आहे.

दक्षिण मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य असे थीम पार्क उभारण्याचे स्वप्न शिवसेनेचे होते. शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी तसा ठराव मांडल्यानंतर मुंबई महानगरपालिका सभागृहाने मंजूर केला होता. मात्र त्यावर त्यावेळेच्या राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र भाडेकरार संपून दहा वर्षे झाल्यानंतर हा विषय चांगलाच तापला आहे.

हे ही वाचा:

चेतन शर्मा पुन्हा निवड समितीचे अध्यक्ष, ‘या’ माजी क्रिकेटपटूंच्या नावांवर BCCIचा शिक्कामोर्तब

Tunisha Sharma प्रकरणातील शिझान खानच्या जामिनावरील सुनावणी होणार ९ जानेवारीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version