spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सिद्धिविनायक मंदिरात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत मनसेचा मोर्चा

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात (Shree Siddhivinayak Temple) कथित आर्थिक व्यवहाराचा आरोप करत मनसे (MNS) आक्रमक झाली. सिद्धिविनायक मंदिर न्यास (Siddivinayak Mandir Nyas) यांच्या कथित अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी करत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज आगर बाजार सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढला.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात (Shree Siddhivinayak Temple) कथित आर्थिक व्यवहाराचा आरोप करत मनसे (MNS) आक्रमक झाली. सिद्धिविनायक मंदिर न्यास (Siddivinayak Mandir Nyas) यांच्या कथित अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी करत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज आगर बाजार सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढला. मनसेने केलेल्या या आरोपांवर सिद्धिविनायक मंदिर न्यास पुढील दोन दिवसात आपली भूमिका मांडणार आहे. सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी देणगी स्वरुपात दिलेल्या पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप मनसेने केला आहे.

प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात (Sidhivinayak Temple) भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देणगीचा गैरवापर करणाऱ्या मंदिर न्यासाच्या विश्वासताना सुबुद्धी देऊन भाविकांना न्याय मिळवून दे असे साकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) सिद्धिवनायक चरणी घातले. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात चाललेला अनागोंदी कारभार आणी कथित गैरव्यवहार कारवाई संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वााखाली बुधवारी आगार बाजार ते सिद्धिविनायक मंदिर मोर्चा काढण्यात आला.

मोर्चात महिलांसह मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. हातात फलक घेऊन विश्वस्थांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी करत मंदिर परिसरात घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन सिद्धिविनायकचे दर्शन घेतले. मंदिर हे लोकांच्या श्रद्धेचे स्थान आहे आर्थिक गैरव्यावहारचा अड्डा नाही, प्रत्येक रोगराई स्वच्छता शिकवते पण आपण कोव्हिडच्या माध्यमातून दान पेटीच साफ केली, राजकारणात देवावर श्रद्धा ठेवणे योग्य मात्र देवाच्या श्रद्धेचा राजकारण करणे हे पाप आहे अशा प्रकारचे वक्तव्य फलकबाजीतून व्यक्त करण्यात आले. अधिवेशनानंतर त्यावर चौकशी होईल आणी कारवाई करण्यात येईल असे आश्वासन सरकारने आम्हला दिले आहे आता आम्ही विध्वस्तना सुबुद्धी देण्यासाठी सिद्धिविनायकला गाऱ्हाणे घालण्यासाठी आलो असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.

मनसेचे आरोप काय?

कोरोना काळात सिद्धिविनायक मंदिर अध्यक्ष आणि विश्वस्त यांनी मिळून हा आणागोंदी कारभार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप मनसेने केला आहे.

  • सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी देणगी स्वरुपात दिलेल्या पैशांचा गैरव्यवहार सिद्धिविनायक मंदिर न्यासने केला.
  • कोरोना काळात शिवभोजन थाळी त्यासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच कोटी रुपये देण्यात आले, त्यात गैरव्यवहार झाला.
  • १६ हजार लिटर तूप मागवण्यात आले आणि इतर मंदिरांना सुद्धा ते देण्यात आले, त्याचा वापर कसा करण्यात आला जर विक्री केली असेल तर त्याचा तपशील कुठे आहे?
  • ॲडव्हान्स टॅक्स १ कोटी ४० लाख
  • सांगली महापूर १०० ट्रक पाणी
  • इमारत दुरुस्तीमध्ये ठेकेदाराला दंड नाही
  • क्युआर कोडमध्ये घोटाळ्याचा आरोप
  • सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकरांवर गंभीर आरोप

हे ही वाचा : 

“कर्नाटक सरकारची राजरोस दादागिरी मात्र राज्यातील ईडी सरकार अळीमिळी गुपचिळी”

आदिवासी विभागाला एवढा निधी दिला जातो मग आदिवासी समाजाचा विकास का नाही भुजबळांचा सरकारला सवाल

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss