Sunday, July 7, 2024

Latest Posts

MNS Raj Thackeray यांचं Naresh Mhaske साठी सूचक वक्तव्य, दिल्लीत गेलात म्हणजे…

या निवडणुकीत मला उमेदवारी घोषित झाल्यानंतर राज साहेबांना भेटायला गेलो, आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच प्रचाराला सुरुवात केली.

९ जून रोजी दिल्ली येथे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा शपथविधी पार पडला. परंतु, या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आमंत्रण न दिल्याने मनसेत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात राज ठाकरे यांनी गुरुवारी सर्व पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या तीन नेत्यांनी मनसे (MNS) प्रमुखांची शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थावर (Shivtirth) भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske), शिवसेना मुंबई पदवीधर मतदार संघाचे दिपक सावंत (Deepak Sawant) हे राज ठाकरे यांना भेटले. या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या भेटीनंतर नरेश म्हस्के यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त होत पोस्ट केली आहे. आदरणीय राज साहेब… विद्यार्थी दशेपासून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांचा आदर्श समोर ठेवत मी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली, विद्यार्थी सेनेचे काम करत असताना साहेबच आमचे बॉस होते. या निवडणुकीत मला उमेदवारी घोषित झाल्यानंतर राज साहेबांना भेटायला गेलो, आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी खास माझ्यासाठी आणिडॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ठाण्यात सभा ही घेतली. त्या सभेला उदंड प्रतिसाद मिळाला. साहेबांचे भाषण हे संपूर्ण देशाचं आकर्षण बिंदू असतं. त्या सभेने आम्हाला जिंकून येण्याचा मोठा आत्मविश्वास दिला. सभा संपल्यावर पाठीवर हात ठेवत त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या, आणि त्याचं फलित आज समोर असल्याचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर पुन्हा एकदा आशीर्वाद घेण्यासाठी आज आदरणीय राज साहेबांची भेट घेतली. सोबत माझे सगळे कार्यकर्ते, आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि युवासेनेचे ठाण्यातील पदाधिकारी उपस्थित होते. साहेबांनी दिलखुलास गप्पा मारत, “दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका, मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्हाला दिल्लीत पाठवलं आहे” अशी दरारायुक्त सूचना केली… त्यांची प्रत्येक सूचना आम्हाला मोलाची आहे. राज साहेब, मराठी माणसाचा आवाज तर आम्ही बुलंद करूच पण आपल्या या मातीतल्या माणसांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, समस्या, आणि विषय यांना वाचा फोडण्याचं काम नक्कीच करू आणि तुमचा विश्वास सार्थ ठरवू, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

सहाय्यक उपनिरीक्षक पदभरती साठी अर्ज करायचा आहे तर, जाणून घ्या संपूर्ण पद्दती..

शेतकऱ्यांसाठी नवी खुश खबर ; पंतप्रधानांनी आणली ‘ही’ योजना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss