मनसेनं सिद्धीविनायक ट्रस्टची डायरी दाखवत आदेश भावोजींवर केले भ्रष्टाचाराचे आरोप

शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर शिंदे गट विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यातच, सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना (Aadity Thackeray) लक्ष्य केलं आहे. शिवसेनेच्या संजय राऊतांवरही शिंदे गटाकडून निशाणा साधण्यात येत आहे.

मनसेनं सिद्धीविनायक ट्रस्टची डायरी दाखवत आदेश भावोजींवर केले भ्रष्टाचाराचे आरोप

शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर शिंदे गट विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यातच, सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना (Aadity Thackeray) लक्ष्य केलं आहे. शिवसेनेच्या संजय राऊतांवरही शिंदे गटाकडून निशाणा साधण्यात येत आहे. आता, शिवसेनेचे आणखी एक नेते आणि सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर (Siddhivinayak Temple Trust President Adesh Bandekar) यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करण्यात आले आहेत. मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण (MNS General Secretary Manoj Chavan) यांनी डायरी छपाईचा मुद्दा उपस्थित करत, हा घ्या डायरीचा पुरावा… म्हणत काही कागदपत्रेच शेअर केली आहेत. त्यामुळे, बांदेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्यानंतर आता मनसे (MNS) नेते मनोज चव्हाण यांनींही आदेश बांदेकरांवर नवा आरोप केला आहे. सिद्धिविनायक न्यास मंदिराकडून दरवर्षी दैनंदिनी डायरी काढली जाते. परंतु या वर्षी ती काढण्यात आलेली नाही. या डायरीवर आदेश बांदेकरांना उद्धव ठाकरे यांचा फोटो हवा, आहे असा आरोप मनोज चव्हाणांनी केला. तसेच, याप्रकरणी आदेश बांदेकर यांनी खर्च टाळण्यासाठी यंदा डायरी छापली नाही, असे उत्तर दिले. त्यावर, मग डायरीची निविदा का काढली? असे म्हणत चव्हाण यांनी काही फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात (Shree Siddhivinayak Temple) कथित आर्थिक व्यवहाराचा आरोप करत मनसे (MNS) आक्रमक झाली. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात चाललेला अनागोंदी कारभार आणी कथित गैरव्यवहार कारवाई संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वााखाली बुधवारी आगार बाजार ते सिद्धिविनायक मंदिर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांसह मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. हातात फलक घेऊन विश्वस्थांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी करत मंदिर परिसरात घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन सिद्धिविनायकचे दर्शन घेतले. मंदिर हे लोकांच्या श्रद्धेचे स्थान आहे आर्थिक गैरव्यावहारचा अड्डा नाही, प्रत्येक रोगराई स्वच्छता शिकवते पण आपण कोव्हिडच्या माध्यमातून दान पेटीच साफ केली, राजकारणात देवावर श्रद्धा ठेवणे योग्य मात्र देवाच्या श्रद्धेचा राजकारण करणे हे पाप आहे अशा प्रकारचे वक्तव्य फलकबाजीतून व्यक्त करण्यात आले. अधिवेशनानंतर त्यावर चौकशी होईल आणी कारवाई करण्यात येईल असे आश्वासन सरकारने आम्हला दिले आहे आता आम्ही विध्वस्तना सुबुद्धी देण्यासाठी सिद्धिविनायकला गाऱ्हाणे घालण्यासाठी आलो असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात दाखल, महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावरून आक्रमक

हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक, ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version