Monsoon Session: बेस्टच्या डेपो आणि कॉलनीचा पुनर्विकास, बेस्टच्या मोक्याच्या जागेवर डोळा?

Monsoon Session: बेस्टच्या डेपो आणि कॉलनीचा पुनर्विकास, बेस्टच्या मोक्याच्या जागेवर डोळा?

मुंबईतील मोक्याच्या जागांवर असलेल्या बेस्टचे डेपो आणि आगारांवर बिल्डरांचा आणि राजकारण्यांचा डोळा आहे. यापूर्वी माहीमच्या बस डेपोमध्ये टोलेजंग टाँवर झाला आणि खालची जागा बेस्टच्या डेपोला दिली आहे. आता बेस्टच्या काही डेपोंचा पुनर्विकास करण्याची योजना आहे. पण पुनर्विकासाच्या नावाखाली बेस्टच्या मोक्याच्या जागा बेस्टच्या हातातून जाऊ नये अशी मागणी बेस्टच्या कर्मचा-यांकडून लवकरच पुढे येण्याची शक्यता आहे कारण मुंबईतील बेस्टच्या 27 वसाहती आणि 27 आगारांच्या पुनर्विकासासाठी मुंबई महापालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापकांच्या  अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार आहे. महिनाभर याबाबतचा अहवाल मागवला जाईल. या अहवालातील शिफारशीनुसार पुढील कार्यवाही केली जाईल. अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज 4 जुलै रोजी विधान परिषदेत केली. हा पुनर्विकास बीडीडीच्या धर्तीवर करायचा की, म्हाडा (MHADA), सिडको, एमएमआरडीए (MMRDA) च्या धर्तीवर करायचा याचा निर्णय नंतर घेतला जाईल.

पुनर्विकास बेस्टने करावा

पुनर्विकासासाठी म्हाडा आणि एमएमआरडीएचा पर्याय आहे. मात्र, बेस्ट उपक्रम आणि बेस्टची यंत्रणाच एवढी मोठी आहे की, त्यात अनेक आर्किटेक्ट आणि तज्ज्ञ आहेत. त्यामुळे 27 वसाहती आणि आगारांचा पुनर्विकास करताना बेस्टमध्ये पुनर्विकास करण्यासाठी योग्य ती यंत्रणा निर्माण करून पुनर्विकास केला जावा. त्यामुळे बेस्टची जागा बेस्टच्या ताब्यात राहील. बेस्टने पुढाकार घेऊन हे सर्व केले तर बेस्टचा आर्थिक फायदा जास्त होऊ शकतो. दरम्यान, दोन हजार जणांना अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीत न ठेवता पालिकेच्या मदतीने त्यांना तात्पुरते सामावून घ्यावे, अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी केली.

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये प्रवाशांना अविरत परिवहन सेवा आणि अखंडित वीजपुरवठा करणाऱ्या बेस्टमध्ये भरती आणि पदोन्नती थांबली आहे. त्यामुळे यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांची पदभरती करावी, निवृत्त कर्मचा-यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी 800 कोटी मिळालेले नाही. कोविड भत्त्याची 78 कोटी मिळालेले नाही, 700 कर्मचा-यांना कायम करावे, बेस्टच्या 27 वसाहतींचा पुनर्विकास करून 15 लाखांमध्ये बेस्ट कर्मचा-यांना घरे दिली जावीत, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. त्यावर उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, बेस्टमधील अधिकारी आणि कर्मचारी यांची आवश्यकता लक्षात घेऊन पदभरती करण्याबाबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. निवृत्तीवेतनाबाबत उच्च मुंबई न्यायालयाने दिलेला निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. तुट देताना सातत्य ठेवले जाईल

 बेस्टमध्ये आवश्यकतेनुसार भरती 

बेस्टमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सध्याचा पदांचा तातडीने आढावा घेण्याची सूचना बेस्टच्या प्रमुखांना दिल्या जातील. त्यांनी जर या मध्ये तयारी दाखवली तर पदांची आवश्यकेनुसार भरती केली जाईल, अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली.

हे ही वाचा:

राजकीय वर्तुळात आता येणार नवे वळण ; VASANT MORE घेणार ठाकरेंची भेट !

MAHARASHTRA LEGISLATIVE COUNCIL ELECTION 2024 : विधान परिषदेत १५ आमदार होणार निवृत्त ; नवे तीन सदस्य निवडणूक जिंकून परतणार सभागृहात
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version