Thursday, July 4, 2024

Latest Posts

Monsoon Session: आरटीओचे ‘लायसन्स टू किल’, विधानसभेत गाजला अंधेरी RTO च्या लायसन्सचा मुद्दा

राज्यातल्या आरटीओ (RTO) मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स कशाप्रकारे दिली जातात यावर अनेकदा अनेकदा अनेक वेळा विविध प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मोटर ट्रेनिंग स्कूल मार्फत ड्रायव्हिंग टेस्ट साठी गेलात तर शंभर टक्के लायसन्स मिळते अशी सध्या परिस्थिती आहे गाडी चालवता येत नसेल तरीही ड्रायव्हिंग लायसन्स मिळते अगदी ड्रायव्हिंग टेस्ट न देताही ड्रायव्हिंग लायसन्स मिळते. पण अनेकदा हे ‘लायसन्स टू किल’ असे घडले आहे कारण व्यवस्थित मोटर चालवता येत नसतानाही हातात लायसन्स मिळाल्याने जीवघेणे अपघात घडले आहेत. पुण्यातल्या पोर्शो कारच्या हिट अँड रन(Heat and run) प्रकरणानंतर परिवहन विभागाची (RTO) लक्तरे विषयावर टांगली गेली कारण पोर्शे कार पुण्यात नंबर प्लेट विना फिरत होती ड्रायव्हिंग लायसन्स विना गाडी चालवत असल्याचे पुढे आले आहे आरटीओच्या याच कारभाराचे पडसाद २८ जूनला विधानसभेत उमटले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आरटीओ विभागाची लक्तरे  पॉईंट ऑफ इन्फरमेशनच्या माध्यमातून  आरटीओमधील गैरप्रकाराची लक्तरे सभागृहात टांगली.

अंधेरी आरटीओ (RTO) ने गेल्या वर्षी अनधिकृत वाहनांचा वापर करून बनावट ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्या आणि त्या आधारे सुमारे ७६ हजार ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले आहेत. अशी लायन्स जारी केल्यानेच पुणे (Pune) येथे घटलेल्या पोर्शे कार अपघातासारखी प्रकरणे घडत आहेत. दोन दुचाकींवर ४१ हजार ९३ ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले गेले, तर इतर ३५ हजार २६१ ड्रायव्हिंग लायसन्स दोन कारवर देण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. प्रादेशिक परिवहन कार्यालये भ्रष्टाचाराची माहेरघरं झाली आहेत. या आधी आरटीओचा घोटाळा काही नवीन नाही. पण आता अंधेरी (Andheri) येथील आरटीओचा १२५ कोटींचा मोठा घोटाळा समोर आला आहे. या संपूर्ण  प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. माणसं मेली तरी आरटीओना काही फरक पडत नाही. आम्हाला फक्त पैसा द्या. तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा नाही. आम्हाला फक्त पैसा महत्वाचा आहे. अशा पद्धतीने बेदरकारपणे या कार्यालयाचा कारभार सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

हे ही वाचा:

Maharashtra Budget Session 2024: राज्यातील जनतेची दिशाभूल करणारा बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प, Nana Patole यांची टीका

Maharashtra Budget Session 2024: आजचे बजेट म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’, Jayant Patil यांची मिश्किल टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss