Thursday, July 4, 2024

Latest Posts

Monsoon Session: धक्कादायक! राणीच्या बागेतील ७१ प्राणी मृत्युमुखी -रक्तस्त्राव, तणाव आणि संसर्ग कारणीभूत

भायखळा येतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय अर्थात राणीची बाग हे मुंबईकरांचेच देशभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. खास करून या उद्यानात पेंग्विन दाखल झाल्यापासून पर्यटकांची संख्या तर कमालिची वाढत गेली आहे. दररोज दररोज पाच ते सहा हजार तर शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पंधरा ते सोळा हजार तर रविवारी पर्यटकांची संख्या वीस हजारांवर जात आहे. त्यामुळे याआधी दररोज १५ ते २० हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न आता एक ते आठ-दहा लाखांपर्यंत गेले आहे. तर सरासरी उत्पन्न प्रतिदिवस दीड लाख तर महिन्याचे सरासरी उत्पन्न ४५ लाख रुपयांच्यावर गेले आहे. पेंग्विनमुळे राणीच्या बागेचे नाव प्राणी संग्रहालयाचे नाव देशभरातील प्राणीसंग्रहालयामध्ये अग्रभागी घेतले जाते. आता तर राणीच्या बागेतील पेंग्विन आता गुजरातसह, ओडिशा, गोरखपूर व लखनौमध्ये प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात येणार आहे.

या प्राणीसंग्रहालयांना राणीच्या बागेतील अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत पण तरीही प्राण्यांच्या देखभालीकडे दुर्क्षल होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. विधानसभेत २ जुलै रोजी राणीच्या बागेच्या संदर्भात तारांकित पश्न विचारण्यात आला होता. त्यातून राणीच्या बागेतील मृत्युमुखी पडलेल्या प्राण्यांची आकडेवारी पुढे आली आहे.  एप्रिल २०२२ ते एप्रिल २०२४ या कालावधीत ७१ प्राणी पक्षांचे वृध्दापकाळ, रक्तस्त्राव,  संसर्ग, तणावामुळे मृत्यु झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मध्यंतरी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने देशभरातील प्राणी संग्रहालयातील प्राणी व प्रक्ष्यांबाबतची आकडेवारी प्रसिध्द केली होती. त्यात वीरमाता जीजाबाई भोसले प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचा ह्रदयविकार, श्वसनक्रिया बंद होणे, अवयव निकामी अशा विविध कारणांमुळे मृत्यु झाल्याचे नमूद केले होते  मृत्मु झालेल्या प्राणी-पक्षांमध्ये  हरीण, इमू, मॅकाक, रीसस, सांबर, अफ्रिकन ग्रे पोपट, काँकॅटियल बडेरिगर, तीतर गोल्डन, भारतीय प्लॅपशेल, कासव, गोल्डन जॅकल आदींचा समावेश होता. यापूर्वी २०१९-२०मध्ये ३२ प्राणी पक्षांचा मृत्यु झाला होता.

आता विधानसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीतून ७१ प्राणी पक्षांचा रक्तस्त्राव संसर्ग तणावामुळे मृत्यु झाला आहे. याचा अर्थ माणसांबरोबरच प्राण्यांमध्येही तणाव असल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राणीच्या बागेतील सर्व प्राणी-पक्ष्याच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाते. लसीकरण, औषधोपचार निर्जंतुकीकरण, उपचार, नियमित आहाराची प्राणी संग्रहालयातील पशुवैद्यकांमार्फत वेळोवेळी पूर्तता केली जाते. पशू-पक्ष्यांच्या देखभालीकडे प्राणी संग्रहालयाकडून कोणतेही दुर्लक्ष करण्यात येत नाही असे उत्तर राज्य सरकारच्यावतीने देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss