Thursday, July 4, 2024

Latest Posts

Monsoon Session: सतरा वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरमध्ये वाहतुकीस पूर्णपणे खुला होणार

मुंबई गोवा महामार्गाचे काम वेगाने करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, आवश्यकतेनुसार पर्यायी कंत्राटदार नेमण्यात आलेले आहेत. हे काम प्रगतीपथावर आहे. सर्व कामे डिसेंबर २०२४ अखेर पूर्ण करणार आहोत या मार्गावरील टप्प्यांचा विचार करता बहुतांशी टप्प्यांचे काम ८५ ते ९० टक्के झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधान परिषदेत दिली.

महाराष्ट्र आणि गोव्याला जोडणारा आणि कोकण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. इंदापूर ते झाराप या आराखड्यास जून २०१३ मध्ये केंद्र शासनाकडून मंजुरी प्राप्त झाली. यानंतर ८० ते ९० टक्के संपादीत जागा ताब्यात घेतली असून यावर आतापर्यंत ३३७४.११ काटींचा खर्च झालेला असून यातील ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत सरकारने सविस्तर माहिती द्यावी आणि संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी केव्हा सुरू करणार हे स्पष्ट करावे अशी मागणी करण्यात आली होती त्यावर रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलं.

भूसंपादन रखडले

५५० किमी लांबीच्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम १० पॅकेजमध्ये सुरू असून वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून सुरू आहे टप्प्यांचा विचार करता बहुतांशी टप्प्यांचे काम ८५ ते ९० टक्के झाले असल्याचेही ते म्हणाले. या कामाच्या कंत्राटदारांनी सब काँट्रॅक्टरना कामे दिल्याने कामात दिरंगाई झाल्याचेही त्यांनी मान्य केले. विशेष म्हणजे काम रखडण्यास अधिकारीवर्ग जबाबदार असल्याचा दावा केला. शिवाय काही ठिकाणच्या भूसंपादनातील कायदेशीर बाबींमुळेही काम रखडल्याचे ते म्हणाले.

हे ही वाचा:

राज्यात अमली पदार्थ विरोधात शासनाचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण – Devendra Fadnavis

‘नीट’ परीक्षा पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त होण्यासंदर्भातील विरोधी व सत्ताधारी पक्षांच्या सूचनांचा सकारात्मक विचार, अजित पवार यांची विधानसभेत माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss